ETV Bharat / state

महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका कोरोनामुक्त; ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात कोरोनावर यशस्वी उपचार - corona positive nurse in raigad

महाड प्रेस असोसिएशन आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वृंदांनी पुष्पवृष्टी, ओवाळणी करीत या परिचारिकेचे स्वागत केले. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन कोरोनामुक्त होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका कोरोनामुक्त; ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात कोरोनावर यशस्वी उपचार
author img

By

Published : May 24, 2020, 7:26 PM IST

रायगड - कोरोना लागण झालेल्या रुग्णाला जिल्ह्यातून पनवेल अथवा मुंबईत उपचारासाठी नेले जाते. मात्र, महाडमधील शासकीय रुग्णालयातील परिचारिकेला कोरोना बाधा झाल्यानंतर तिच्यावर महाडच्या शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले असून ती कोरोनामुक्त होऊन घरी गेली आहे. यावेळी महाड प्रेस असोसिएशन आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वृंदांनी पुष्पवृष्टी, ओवाळणी करीत या परिचारिकेचे स्वागत केले. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन कोरोनामुक्त होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

महाड तालुक्यातील कोकरे गावात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णावर या परिचारिकेने उपचार केले होते. यावेळी तिचा रुग्णांशी आलेल्या संपर्काने तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. 14 मे रोजी परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचाराकरिता मुंबईला पाठवण्याऐवजी तिच्यावर महाडमध्येच उपचार करण्याचा निर्णय महाडच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी घेतला. त्यानंतर या परिचारिकेवर शासकीय रुग्णालयातच उपचार करण्यात आले.

परिचारिकेवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर आज 11 दिवसांनी तिने कोरोनावर मात केली आहे. छोट्या शहरांमधून कोरोनावर उपचारासाठी रुग्ण मोठया शहरांमध्ये नेले जात असताना ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयामध्ये बरी झालेली ही पहिलीच रुग्ण ठरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.