ETV Bharat / state

कॅनरा बँकेचा मदतीसाठी पुढाकार, 450 कुटुंबातील नागरिकांना केली मदत - आदिवासी समाज रायगड

दुर्गम भागातील आदिवासींच्या मदतीसाठी कॅनरा बँक मुंबई शाखेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कॅनरा बँकेच्या CSR फंडातून जवळपास 450 कुटुंबातील नागरिकांना हे साहित्याचे वाटप करण्यात आले.

कॅनरा बँकेचा मदतीसाठी पुढाकार, 450 कुटुंबातील नागरिकांना केली मदत

author img

By

Published : May 26, 2021, 4:38 PM IST

रायगड - गेल्या जवळपास दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. या संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशासह राज्यात वाढता कोरोनाचा धोका आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राज्यात लॉकडाउनही लागू करण्यात आलेले आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने, रोजच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील आदिवासींच्या मदतीसाठी कॅनरा बँक मुंबई शाखेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

कॅनरा बँकेचा मदतीसाठी पुढाकार, 450 कुटुंबातील नागरिकांना केली मदत

कॅनरा बँकेच्या CSR फंडातून कर्जत तालुक्यातील पोशीर येथे मदत करण्यात आली. आदिवासी बांधवांसह येथील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये, जवळपास 450 कुटुंबातील नागरिकांना हे साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी, गिऱ्हाचीवाडी, देवपाडा, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी, पोशीर चिकनपाडा या भागात किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील जवळपास 450 कुटुंबातील नागरिकांना जवळपास 7 लाख रुपये किंमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यात घरात घुसून चाकूहल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.