रायगड : मुंबईहून कणकवलीकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस कशेडी घाटातील 50 फूट दरीत कोसळली. या अपघातात आठ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. साई राणे असे मृत मुलाचे नाव आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३१ प्रवासी प्रवास करत होते. जखमींना पोलादपूर रुग्णालयात दाखल केले आहे. भोगाव गावाजवळ पहाटे 4 वाजता हा अपघात घडला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात -
मुंबईहून चिंतामणी ट्रॅव्हल्स याकंपनीची खासगी बस 31 प्रवाशांना घेऊन कणकवलीकडे चालली होती. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात पहाटे चार वाजता बस आली. असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 50 फूट दरीत कोसळली. सुदैवाने बस एका झाडाला अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आठ वर्षीय मुलगा ठार, तर 15 जखमी -
या अपघातात देवगडच्या एका आठ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर रुग्णालयात दाखल केले आहे. पोलादपूर पोलीस आणि महाडच्या साळुंखे रेस्क्यू टीमने 30 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे.