रायगड - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे घेतलेल्या जागेबाबत जनतेला स्पष्टीकरण द्यावे. निवडणूक लढविताना प्रतिज्ञापत्रामध्ये जमिनीची माहिती लपवली आहे. त्यांनी अन्वय नाईक यांच्या घनिष्ठ संबंध आहेत, हे जाहीर करावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केली आहे. अलिबाग येथे अॅड. महेश मोहिते यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे घराणे हे बिल्डर घराणे झाले आहे, असा आरोप केला.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात जमीन खरेदीची माहिती लपवली; किरीट सोमैय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप - ठाकरे कुटुंब नाईक कुटुंब संबंध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथे सहा वर्षांपूर्वी जागा खरेदी केली आहे. सदर जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकी निवडणूक लढविताना प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये 30 सातबाऱ्याचा उल्लेख आहे. तर किरीट सोमैय्या यांनी 40 उतारे असून 10 जागेचा उल्लेख दाखविला नाही, असा आरोप केला आहे.