ETV Bharat / state

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन संपन्न - अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भूमीपूजन

अलिबाग तालुक्यातील उसर येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने हा सोहळा झाला.

raigad
अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भूमीपूजन
author img

By

Published : Feb 22, 2022, 4:38 PM IST

Updated : Feb 22, 2022, 8:59 PM IST

खालापूर(रायगड) - अलिबाग तालुक्यातील उसर येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने तसेच शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.

बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

अनेक मान्यवरांची उपस्थिती -

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह विविध नेते मंडळीनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती.

पुढील चार वर्षात एकूण १ हजार ७२ पदांची निर्मिती -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित ५०० रुग्ण खाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण १ हजार ७२ पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या ६१.६८ कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे.

या नियोजित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर लवकरात लवकर महाविद्यालयाचे काम पूर्ण करून रायगडकरांचे स्वप्न साकार करावे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Last Updated : Feb 22, 2022, 8:59 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.