रायगड - स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा या अभियानांतर्गत शहर स्वच्छ करण्याचा निर्धार पेण नगरपालिकेने केला असून, या अनुषंगाने शहरातील विश्वेश्वर नदिपात्राजवळ असणाऱ्या मंदिराजवळील संपूर्ण परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला.
हेही वाचा - Pen Holikotsav : प्रचलित गगनचुंबी होळ्यांची जय्यत तयारी
नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जिवन पाटील यांच्या आदेशाने नदीपात्रात वाढलेली जलपर्णी, गवत याबरोबरच गाळ साफ करण्यात आला. नगरपालिकेने शहरात सौर दिवे, चार्जिंग स्टेशन्स, वृक्ष लागवड, सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन असे उपक्रम राबवले आहेत. पहिल्या टप्प्यात जल सर्वधनाच्या संकल्पनेतून भोगावती नदी काठी स्वच्छता करण्यात आली होती. शहरात स्वच्छ अभियान अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने हे काम सुरू आहे. त्यामुळे या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपालिकेचे स्वच्छता व आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी केले आहे. यावेळी प्रशासन स्वच्छता विभाग अभियंता अंकिता नरुटे, अधिकारी राजाराम नरुटे, अधिकारी किरण शहा, आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
आमदार रवींद्र पाटील यांनी केले कौतुक
पेण नगरपालिकेने सुरू केलेल्या माझी वसुंधरा योजने अंतर्गत भोगावती नदी स्वछता अभियानाची आज आमदार रवींद्र पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व नगरपालिकेच्या कार्याचे कौतुक केले.
हेही वाचा - Mini Train Matheran : माथेरानची राणी सुसाट; मध्य रेल्वेने मिनी ट्रेन चालवून दोन कोटी रुपयांची कमाई!