ETV Bharat / state

लोकाभिमुख सेवा देण्‍यावर बॅक ऑफ इंडियाचा भर - महाप्रबंधक सुधीरंजन पाढी - सुधीरंजन पाढी बँक ऑफ इंडिया

ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्‍याचा आमचा प्रयत्‍न असल्याचे बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुधीरंजन पाढी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कृषीकर्ज, कॅशलेस व्‍यवहार, इतर कर्ज, महिला सक्षमीकरण, अनुत्‍पादक कर्ज वसुली या पंचसूत्रीवर काम करणार असल्‍याची माहिती त्यांनी दिली.

ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्‍याचा आमचा प्रयत्‍न असल्याचे बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुधीरंजन पाढी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
author img

By

Published : Aug 18, 2019, 11:37 PM IST

रायगड - राष्ट्रीय बँकांसोबतच खासगी बँकांचे जाळे पसरल्याने बँकिंग क्षेत्रातील स्‍पर्धा वाढली आहे. यामुळे ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्‍याचा आमचा प्रयत्‍न असल्याचे बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुधीरंजन पाढी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कृषीकर्ज, कॅशलेस व्‍यवहार, इतर कर्ज, महिला सक्षमीकरण, अनुत्‍पादक कर्ज वसुली या पंचसूत्रीवर काम करणार असल्‍याची माहिती त्यांनी दिली.

ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्‍याचा आमचा प्रयत्‍न असल्याचे बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुधीरंजन पाढी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाच्‍या अधिकाऱ्यांचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबीर अलिबाग येथे पार पडले. यामध्‍ये प्रत्‍येक शाखेच्‍या कामगिरीचे मूल्‍यमापन करून विचारविनिमय करण्‍यात आला. देशाच्या विकासात बँकांच्या माध्यमातून कोणते योगदान देता येईल याबाबतही शिबीरात चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांसोबत बँकेच्या आर्थिक प्रगतीसाठी कोणत्या योजना राबवता येतील, हे जाणून घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे सुधीररंजन पाढी यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडिया जिल्‍ह्याची अग्रणी बँक आहे. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने उपाययोजना करताना कर्ज योजना, डिजिटल सुविधा, मुद्रा योजना, महिला सक्षमीकरण यासंह इतर काही योजनांचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार असून, शिक्षणासाठी कर्ज, पर्यटन तसेच कृषि क्षेत्रासाठी कर्ज आदींचा त्यात समावेश आहे, असे ते म्हणाले.

जिल्‍ह्यात पनवेल व उरण वगळता बँकेच्‍या 47 शाखा असून त्‍यातील 10 शाखा या निम्‍न शहरी भागात तर 37 शाखा ग्रामीण भागात कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुद्रा लोन किंवा कृषी कर्ज देण्‍यासाठी आम्‍ही आग्रही आहोत. जास्‍तीत जास्‍त गरजू ग्राहकांना कर्ज देण्‍यावर आमचा भर आहे. अनुत्‍पादक कर्जाचे प्रमाण कमी असले तरी वसुली करून ते आणखी कमी करण्‍यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे महाप्रबंधकांनी सांगितले. अनुत्‍पादक कर्जामध्‍ये कृषीकर्जाचा वाटा अधिक असल्‍याची खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. बँकेतर्फे स्‍टार स्‍वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र 2010 पासून जिल्‍ह्यात चालवण्यात येत आहे. त्यामधून आजवर 6 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्‍यात आले असून, यापैकी 4 हजार 366 जणांनी स्‍वयंरोजगार सुरू केला असल्‍याची माहिती पाढी यांनी दिली.

यावेळी रायगड विभाग मॅनेजर विमल राजपूत, विभागीय उपव्यवस्थापक सुभाषचंद्र मिश्रा, एरिया मॅनेजर सुभाषचंद्र खनगवाल तसेच रायगड जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर आनंद निंबेकर व आरएसईटीआय संचालक विजयकुमार कुलकर्णी उपस्थित होते.

Intro:लोकाभिमुख सेवा देण्‍यावर बॅक ऑफ इंडियाचा भर

स्‍पर्धेत टिकण्‍यासाठी पंचसुत्री

सुधीरंजन पाढी यांची माहिती

रायगड : बँकिंग क्षेत्रात स्‍पर्धा कमालीची वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच खाजगी बँकांचे जाळेही पसरत आहे. अशावेळी ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. कृषीकर्ज, कॅशलेस व्‍यवहार, इतर कर्ज, महिला सक्षमीकरण, अनुत्‍पादक कर्ज वसुली या पंचसूत्रीवर काम करणार असल्‍याचे बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुधीरंजन पाढी यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.

बँक ऑफ इंडियाच्‍या रायगड जिल्‍हयातील अधिकाऱ्याचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबीर अलिबाग येथे पार पडले. यामध्‍ये प्रत्‍येक शाखेच्‍या कामगिरीचे मुल्‍यमापन करून विचारविनिमय करण्‍यात आला. भारताच्या विकासात बँकेच्या माध्यमातून काय योगदान देता येईल याबाबतही या शिबीरात चर्चा करण्यात आली. बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकार्‍यांबरोबर विचार विमर्श करून कोणत्या समस्या भेडसावतात आणि त्या कशा सोडवता येतील, त्या बरोबरच बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या योजना राबविता येतील हे जाणून घेण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे सुधीररंजन पाढी यांनी सांगितले.Body:स्‍पर्धा वाढली  तरी बँक ऑफ इंडियाचा ग्राहक वाढत असल्याचे समाधानकारक चित्र असून ग्राहकांना केंद्र बिंदू मानून त्यांना अधिक सुलभ सेवा कशी देता येईल तसेच राष्ट्रीय सेवेत बँकेच्या माध्यमातून कसे योगदान देता येईल याकडे पुढील काळात अधिक भर दिला जाणार असे पाढी यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडिया ही जिल्‍हयाची अग्रणी बँक आहे. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने उपाययोजना करताना कर्ज योजना, डिजिटल सुविधा, मुद्रा योजना, महिला सक्षमीकरण यासंह इतर काही योजनांचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी कर्ज, पर्यटन तसेच कृषि क्षेत्रासाठी कर्ज आदींचा त्यात समावेश आहे.

   जिल्‍हयात पनवेल व उरण वगळता बँकेच्‍या 47 शाखा असून त्‍यातील 10 शाखा या निम्‍न शहरी भागात तर 37 शाखा ग्रामीण भागात कार्यरत आहेत. बँकेतर्फे स्‍टार स्‍वरोजगार प्रशिक्षण केंद्र 2010 पासून जिल्‍हयात चालवले जात आहे. त्‍यातून आतापर्यंत 6 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्‍यात आले असून यापैकी 4 हजार 366 जणांनी स्‍वयंरोजगार सुरू केला असल्‍याची माहिती पाढी यांनी दिली.Conclusion:मुद्रा लोन किंवा कृषी कर्ज देण्‍यासाठी आम्‍ही आग्रही आहोत. जास्‍तीत जास्‍त गरजू ग्राहकांना कर्ज देण्‍यावर आमचा भर आहे. अनुत्‍पादक कर्जाचे प्रमाण कमी असले तरी वसुली करून ते आणखी कमी करण्‍यासाठी उपाययोजना आखल्‍या जात आहेत. अनुत्‍पादक कर्जामध्‍ये कृषीकर्जाचा वाटा अधिक असल्‍याची खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

यावेळी त्यांच्या सोबत रायगड विभाग मॅनेजर विमल राजपूत, विभागीय उपव्यवस्थापक सुभाषचंद्र मिश्रा, एरिया मॅनेजर सुभाषचंद्र खनगवाल, रायगड जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर आनंद निंबेकर, आरएसईटीआय संचालक विजयकुमार कुलकर्णी उपस्थित होते.
 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.