ETV Bharat / state

बँक खाजगीकरणाला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध; कर्मचाऱ्यांनी उगारला आंदोलनाचा हत्यार

अनेक खाजगी बँका ह्या आर्थिक घोटाळ्यामुळे बंद झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय बँकेवर आजही ग्राहकांचा विश्वास आहे. त्यामुळे या बँका आजही ग्राहकाप्रति आपला विश्वास टिकून आहेत. मात्र केंद्र सरकार आता या शासकीय बँकेचे खाजगीकरण करत आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेला बँक अधिकारी, कर्मचारी यांनी विरोध दर्शविला आहे.

author img

By

Published : Mar 15, 2021, 1:40 PM IST

बॅंक कर्मचारी आंदोलन
बॅंक कर्मचारी आंदोलन

रायगड- केंद्र सरकार शासकीय उद्योग, कंपन्या, बंदरे याचे खाजगीकरण करत आहे. आता शासकीय बँकांचाही खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शासकीय बँक कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च असे दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील २७० बँक शाखा दोन दिवस बंद राहणार असून पाच हजार अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बँक ग्राहकांना आपले व्यवहार करता येत नसल्याने मोठी तारांबळ उडत आहे.

खाजगिकरणाला विरोध
सर्व सामान्य नागरिकपासून श्रीमंत व्यक्ती हा शासकीय बँकेत आपले व्यवहार करीत असतो. आपली जमवलेली पुंजी हा सेविग्ज, फिक्स डिपॉझिट खात्यात ठेवत असतो. अनेक खाजगी बँका ह्या आर्थिक घोटाळ्यामुळे बंद झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय बँकेवर आजही ग्राहकांचा विश्वास आहे. त्यामुळे या बँका आजही ग्राहकाप्रति आपला विश्वास टिकून आहेत. मात्र केंद्र सरकार आता या शासकीय बँकेचे खाजगीकरण करत आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेला बँक अधिकारी, कर्मचारी यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बँक अधिकारी, कर्मचारी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.

जिल्ह्यातील २७० शाखा दोन दिवस राहणार बंद
रायगड जिल्ह्यातील २७० बँकेच्या शाखा १५ व १६ मार्च असे दोन दिवस बंद राहणार आहेत. या शाखेतील पाच हजार अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन, एआयबीओसी, एआयबीइए या बँक संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे. दोन दिवस बँक बंद राहणार असल्याने याचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात अलिबाग युनियन बँकेसमोर बँक अधिकारी, कर्मचारी यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली आहे.

हेही वाचा-नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पोलीस आयुक्तांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.