ETV Bharat / state

युती न झाल्यास शिवसेनेचा पनवेलमध्ये बॅकअप प्लॅन - पनवेल युती

विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजु लागल्यावर महाराष्ट्रभर निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचा घेतलेला आढावा....

भाजप -शिवसेना युती
author img

By

Published : Sep 23, 2019, 12:15 PM IST

Updated : Sep 23, 2019, 12:59 PM IST

रायगड- राज्यात विधानसभा निवडणुक जाहीर झाली आहे. राज्यात एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा फॉर्म्युला ठरला असला तरी शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला मात्र, अद्यापही ठरलेला नाही. युतीबाबत अद्यापही अनिश्‍चितता असल्यामुळे पनवेलमधील शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे.

'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने पनवेल विधानसभा मतदार संघाचा घेतलेला आढावा
भाजप-सेना युती झाली नाही तर पनवेल विधानसभा मतदासंघातून शिवसेनेतील जवळपास सहा इच्छुक उमेदवारांनी बाशिंग बांधले आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पनवेलमध्ये बरीच मेहनत घेतली होती. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती झाली नाही तर पनवेलमध्ये भाजपच्या समोर शिवसेनेचे उमेदवार उभे करण्यासाठी नुकत्याच सेना भवनात मुलाखती घेण्यात आल्या. यात जिल्हाप्रमुख शिरिष घरत, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे यांचा समावेश आहे.शिरीष घरत हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यावर रायगड उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांनतर रायगड जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असताना शिरीष घरत यांनी रायगड आणि पनवेल मध्ये शिवसेनेची ताकद वाढवली आहे. त्यामुळे जर भाजप-सेना युती झाली नाही तर पनवेलमधून सेनेतर्फे शिरीष घरत यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पनवेलमधील राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहण्यासाठी युती फिस्कटल्याची किंवा युती झाल्याच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे.

पनवेल

राज्यात विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. राज्यात एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा फॉर्म्युला ठरला असला तरी शिवसेना भाजपा युतीचा फॉर्म्युला मात्र अद्यापही ठरलेला नाही. जितकं महत्व भाजप-सेनेच्या युतीला आहे, तितक्याच महत्वाचं आता पनवेलमधलं राजकारण बनलं आहे. भाजप-सेनेच्या युतीबाबत अद्यापही अनिश्‍चितता असल्यामुळे पनवेलमधील शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांची धडधड वाढलीये. भाजप- सेना युती झाली नाही तर पनवेल विधानसभामधून शिवसेनेतील जवळपास सहा इच्छुक उमेदवारांनी बाशिंग बांधलं आहे. पनवेलविधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवडणूक आणण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पनवेलमध्ये बरीच मेहनत घेतली होती. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती झाली नाही तर पनवेलमध्ये भाजपच्या समोर शिवसेनेचे उमेदवार उभे करण्यासाठी नुकतंच सेना भवनात मुलाखती घेण्यात आल्या. यात जिल्हाप्रमुख शिरिष घरत, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे यांचा समावेश आहे.

Body:शिरीष घरत हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यावर रायगड उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यांनतर रायगड जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असताना शिरीष घरत यांनी रायगड आणि पनवेल मध्ये शिवसेनची ताकद वाढववली आहे. त्यामुळे जर भाजप-सेना युती झाली नाही तर पनवेलमधून सेनेतर्फे शिरीष घरत यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. Conclusion:त्यामुळे पनवेलमधील राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहण्यासाठी प्रतीक्षा आहे ती युती फिस्कटल्याची किंवा युती झाल्याच्या निर्णयाची.

प्रमिला पवार, ईटीव्ही भारत, पनवेल

Last Updated : Sep 23, 2019, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.