खालापूर (रायगड) - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर फाट्यावर 19 जूनला खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा, डॉ. प्रसाद रोकडे व खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली विनाकारण फिरणाऱ्या 154 वाहन चालकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 4 जण पॉझिटिव्ह आढलल्याने त्याच्यावर उपचार करून त्यांना औषधे देत काळजी घेण्याची ताकीद देण्यात आली.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी खालापूर पोलीस व आरोग्य यंत्रणा सतर्क -
सध्या परिस्थितीत कोरोनाने सर्वाना हैराण करून सोडले आहे. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
विनाकारण बाहेर पडताय तर सावधान -
बाहेर विनाकरण फिरणाऱ्यांना अद्दल शिकवण्यासाठी खालापूर आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणेने नवी शक्कल लढवत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा, डॉ. प्रसाद रोकडे व खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-पुणे महामार्गावर विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची अँटिजेन टेस्ट मोहीम हाती घेतली आहे. 19 जूनला 154 वाहन चालकांची टेस्ट करण्यात आली, यामध्ये 4 जण कोरोना बाधित सापडल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. ही मोहीम पार पाडताना डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा, श्याम गायकवाड, हनुमान गोवारी शर्मिला पाटील, पोलीस सुभाष म्हात्रे, गणेश शिंदे, महिला पोलीस डावरे, होमगार्ड झोरे, नगरपंचाय कर्मचारी तुषार धाडवे आदी उपस्थित होते.