ETV Bharat / state

Anand Teltumbade : आनंद तेलतुंबडेची तळोजा कारागृहातून सुटका; एल्गार परिषद प्रकरणात 2 वर्षे होते अटकेत

author img

By

Published : Nov 26, 2022, 9:15 PM IST

एल्गार परिषदेचे आरोपी आनंद तेलतुंबडे यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे. सुटकेनंतर आपल्याला नाहक त्रास दिल्याची प्रतिक्रीया आनंद तेलतुंबडेंंनी (Anand Teltumbade) दिली.

Anand Teltumbade
आनंद तेलतुंबडेंची तळोजा कारागृहातून सुटका; एल्गार परिषद प्रकरणात 2 वर्षे होते अटकेत

नवी मुंबई : एल्गार परिषद (Elgar Parishad) प्रकरणात प्रा.आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज दुपारी दिडच्या सुमारास त्यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे कारागृहातून बाहेर आले आहेत. 18 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाने भीमा कोरेगाव प्रकरणात तेलतुंबडे यांना जामीन दिला होता.

2 वर्षे तुरुंगात : मात्र NIA नं सुप्रीम कोर्टात अपिल करण्यासाठी वेळ मागितला होता. तो वेळ हायकोर्टानं दिल्यानं प्रा. तेलतुंबडेंना आठवडाभर तुरुंगातच राहावं लागले. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात तेलतुंबडे यांच्याविरुद्ध कलम 38 आणि 39 दहशतवादी संघटनेतील सदस्यत्वाशी संबंधित फक्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या गुन्ह्यांमध्ये कमाल शिक्षा 10 वर्षे तुरुंगवासाची होती आणि तेलतुंबडे यांनी यापूर्वी 2 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला होता. प्रा. तेलतुंबडे यांना अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये (UAPA) अटक करण्यात आली होती. 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेचे संयोजक प्रा. आनंद तेलतुंबडे होते, असा आरोप एनआयएनं ठेवला होता. या परिषदेनंतर भीमा कोरेगाव दंगल झाल्याचा आरोप आहे. या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.