रायगड - पेणच्या जवळ असणाऱ्या गोविर्ले गावाजवळ झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात, शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केशव मानकावले (रा. गणपती वाडी) हे आपल्या गाडीमधून पनवेलहून पुण्याला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला (एमएच ०६ बीई २२२३) अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षण कठडे, आणि त्याशेजारून जाणारी पाण्याची पाईपलाईन या दोन्हीच्या मध्ये त्यांची गाडी अडकली. त्यात, त्यांना आणि हरिभाऊंना जबर मार लागला.
यावेळी, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी हरिभाऊ पाटील यांना मृत घोषित केले. तर, गंभीर जखमी झालेल्या केशव यांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्यात आले. दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : पतीची हत्या करून पत्नीचा प्रियकर आणि चिमुरडीसह आत्महत्येचा प्रयत्न; मुलीचा मृत्यू