ETV Bharat / state

खारघरमध्ये अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या एकाला अटक

खारघर सेक्टर -३५ भागात मेस्किलीन अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला खारघर पोलिसांनी अटक केली. त्याच्या जवळ २ लाख २० हजार किंमतीची ४४ ग्रॅम पावडर आढळून आली.

a drug dealer was arrested In Kharghar
खारघरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकाला अटक
author img

By

Published : Dec 27, 2019, 3:15 PM IST

पनवेल - खारघर सेक्टर-35 भागात मेस्किलीन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लाऊन अटक केली आहे. जुबेर इलियाज खान (वय. 27) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या जवळ असलेली 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 44 ग्रॅम मेस्किलीन या अमली पदार्थाची पावडर जप्त केली आहे. जुबेर खान याने हे अमली पदार्थ कुठून व कुणाला देण्यासाठी आणले याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

खारघरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकाला अटक

खारघर मधील पापडीचा पाडा चौकात एक व्यक्ती मेस्किलीन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने व त्यांच्या पथकाने खारघर मधील पापडीचा पाडा चौकात रात्री सापळा लावला होता. त्यानंतर पापडीचा पाडा चौकात संशयास्पदरित्या आलेल्या तरुणाला त्या भागात दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एका पिशवीमध्ये 2 लाख 20 हजार रुपये किंमतीची व 44 ग्रॅम वजनाची मेस्किलीन अमली पदार्थाची पावडर आढळून आली. या पावडरची खातरजमा केल्यांनतर पोलिसांनी मेस्किलीन पावडर जप्त करुन जुबेर खान याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

Intro:सोबत फाईल फुटेज जोडले आहे

पनवेल

खारघर सेक्टर-35 भागात मेस्किलीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला गुन्हे शाखेच्या अमंली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लाऊन अटक केली आहे. जुबेर इलियाज खान (27) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळ असलेली 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 44 ग्रॅम मेस्किलीन या अंमली पदार्थाची पावडर जप्त केली आहे. जुबेर खान याने सदरचे अंमली पदार्थ कुठून व कुणाला देण्यासाठी आणले याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.Body:खारघर मधील पापडीचा पाडा चौकात एक व्यक्ती मेस्किलीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने व त्यांच्या पथकाने खारघर मधिल पापडीचा पाडा चौकात रात्री सापळा लावला होता. त्यानंतर पापडीचा पाडा चौकात संशयास्पदरित्या आलेल्या तरुणाला त्या भागात दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले.Conclusion:पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एका फ्लॅस्टीच्या पिशवीमध्ये 2 लाख 20 हजार रुपये किंमतीची व 44 ग्रॅम वजनाची मेस्किलीन अंमली पदार्थाची पावडर आढळुन आली. या पावडरची खातरजमा केल्यांनतर पोलिसांनी मेस्किलीन पावडर जप्त करुन जुबेर खान याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.