नवी मुंबई - शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने थोडाफार दिलासा प्रशासनाला आणि नागरिकांना मिळतो आहे. बुधवारी नवी मुंबईत ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून २२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत १३७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. तर आत्तापर्यंत शहरात ९,१५३ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये ६,९२२ अहवाल निगेटीव्ह आले असून ८६७ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबीत आहे. सद्या शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३६४ इतकी आहे.
१३६४ पैकी शहरात आतापर्यंत ५३२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून ७८७ व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघे एपीएमसी मार्केटमधील आहेत.