ETV Bharat / state

400 वर्षांपूर्वी बांधलेला नागोठणे पूल मोजत आहे अखेरच्या घटका

अंबा नदीवरील 400 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. या पुलाचा वापर रोहा मार्गे नागोठणे शहरात येण्यासाठी होतो.

अंबा नदीवरील 400 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक पूलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
author img

By

Published : Sep 6, 2019, 5:43 PM IST

रायगड - अंबा नदीवरील 400 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. पुराच्या पाण्याचा तडाखा बसल्याने पुलाची दुरावस्था झाली आहे.

अंबा नदीवरील 400 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक पूलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

या पुलाचा वापर रोहा मार्गे नागोठणे शहरात येण्यासाठी होतो. नागोठण्याचा हा ऐतिहासिक पूल १५८० मध्ये काझी अल्लाउद्दीन यांनी निजाम राजवटीमध्ये बांधला होता. चुना आणि अंड्याचे मिश्रण करून बांधलेला हा पूल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे.

हेही वाचा - तुळशीखिंडीत रस्ता खचला, कशेडी घाटाकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद

पूल ऐतिहासिक असल्याने तो पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र, या ऐतिहासिक पुलाकडे ना पुरातत्व खात्याचे लक्ष आहे, ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे.
पुलाचे संरक्षक कठडे फोडून जिओ व अन्य दुरसंचार कंपन्यांनी बेकायदेशीररित्या वजनदार केबल टाकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात पुलाचे कठडे वाहून गेले. पुलावरून छोटी वाहने व पायी प्रवास करणाऱ्या नागोठणेकरांचा जीव धोक्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न नागोठणेकर करीत आहेत.

Intro:400 वर्षांपूर्वी बांधलेला नागोठणे पूल मोजत आहे अखेरच्या घटका

पुरातत्व व सार्वजनिक विभागाचे मात्र दुर्लक्ष

पुरामुळे पुलाचे कठडे गेले वाहून

रायगड : रोहा मार्गे नागोठणे शहरात येण्यासाठी अंबा नदीवर 1581 साली म्हणजे 400 वर्षांपूर्वी काझी अल्लाउद्दीन यांनी बांधलेला ऐतिहासिक पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षतेमुळे अखेरच्या घटका मोजत आहे. हा पूल पुराच्या पाण्याचा तडाखा सोसून अजूनही दुरावस्थेत उभा आहे. त्यामुळे या पुलाला पुन्हा पुनर्जीवन अशी अपेक्षा नागोठणेकरांची अनेक वर्षांपासून आहे.Body:नागोठण्याचा हा ऐतिहासिक पूल 1580 मध्ये काझी अल्लाउद्दीन यांनी बांधला होता. त्याकाळी निजामाचे राज्य असल्याने अंबा नदीवरून नागोठणे कडे येण्यासाठी व जाण्यासाठी हा पूल बांधला गेला. चुना आणि अंड्याचे मिश्रण करून बांधलेला हा पूल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. हा पूल म्हणजे नागोठणेची शान आहे. हा पूल ऐतिहासिक असल्याने तो पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत आहे. मात्र या ऐतिहासिक पुलाकडे ना पुरातत्व खात्याने लक्ष दिले ना सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यामुळे हा पूल आता अखेरच्या घटका मोजू लागला आहे. Conclusion:1989 च्या महापुरानंतर सतत पुराचे तडाखे सोसणारा हा पूल धोकादायक झाला असतानाच त्याचे संरक्षक कठडे फोडून जिओ व अन्य केबल कंपन्यांनी बेकायदेशीररीत्या वजनदार केबल टाकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात तर या पुलाचे कठडेच वाहून गेले आहेत. या पुलावरून अवजड वाहतूक बंद असली तरी या पुलावरून छोटी वाहने व पायी प्रवास करणाऱ्या नागोठणेकरांचा जीव धोक्यात आला आहे. तोल गेला तर पुराच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या या अंबा नदीत बुडून प्राणहानी होण्याची शक्यता निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम खाते आता तरी याकडे लक्ष देणार का, असा सवाल नागोठणेकर करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.