ETV Bharat / state

कळंबोलीत शाळेजवळ बॉम्ब ठेवणाऱ्या ३ जणांना अटक; बिल्डरला धमकवण्यासाठी रचला होता कट

कळंबोली येथील सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर १५ दिवसांपूर्वी एका हातगाडीवर टाइमबॉम्ब ठेवण्यात आला. हा बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपींना ठाण्यात नेताना पोलीस
author img

By

Published : Jul 4, 2019, 9:46 PM IST

पनवेल - कळंबोलीतील सुधागड महाविद्यालया शेजारी स्फोटक ठेवणाऱ्या आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यात एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील २ जण पनवेल आणि १ जण पुण्यातील राहणारा आहे. या घटनेचा कुठल्याही अतिरेकी संघटनेशी संबध नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. एका बिल्डरला धमकवण्यासाठी हा बॉम्ब ठेवण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे.

कळंबोलीत शाळेजवळ बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपींची माहिती देताना पोलीस

कळंबोली येथील सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर १५ दिवसांपूर्वी एका हातगाडीवर टाइमबॉम्ब ठेवण्यात आला. नवी मुंबई आणि दहशतवाद विरोधी पथक या दोनही तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर हा बॉम्ब ठेवणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुशील साठे (३५), मनीष भगत (४५), दिपक दांडेकर (५५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी भगत आणि दांडेकर हे पनवेलच्या उलवे याठिकाणचे रहिवासी आहेत. तर साठे हा पुण्यातल्या हवेली कोंढवा येथील रहिवासी आहे. एका बिल्डरकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागून त्याला धमकवण्यासाठी या तिघांनी हा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे.

दांडेकर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून दांडेकरच्या वडिलांचे दगड खाणीचा व्यवसाय असल्याने त्याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती. साठे आणि दांडेकर यांच्यावर मोठे कर्ज होते. कळंबोली येथे ठेवलेल्या बॉम्बव्यतिरिक्त पोलिसांना आणखी एक बॉम्ब तपासा दरम्यान हाती लागला आहे.

सुशीलने हा बॉम्ब ठेवला होता. हा प्रकार तेथे असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याद्वारे पोलिसांनी संशयित व्यक्तीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीत संबंधित आरोपीने डोक्यावर टोपी घातली होती. स्वत:चा चेहरा कॅमेऱ्यामध्ये येणार नाही याची काळजी घेतली होती. पण तरीही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Intro:बातमीला पॅकेज सोबत जोडला आहे

पनवेल

कळंबोलीतील सुधागड महाविद्यालयाशेजारी स्फोटकं ठेवणाऱ्या आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. यात एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघे पनवेल आणि एक जण पुण्यातील राहणारा आहे. या घटनेचा कुठल्याही अतिरेकी संघटनेशी संबध नसल्याचे तपासात उघडकीस आलंय. एका बिल्डरला धमकवण्यासाठी हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.
Body:

१५ दिवसांपूर्वी कळंबोली येथील सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका हातगाडीवर टाइमबॉम्ब ठेवण्यात आला. नवी मुंबई व दहशतवाद विरोधी पथक या दोनही तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करीत होते. अखेर हा बॉम्ब ठेवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुशील साठे (35), मनीष भगत (45), दीपक दांडेकर (55) अशी अटक आरोपींची नावं आहेत. यापैकी भगत आणि दांडेकर हे पनवेलच्या उलवे याठिकाणचे रहिवासी आहेत. तर साठे हा पुण्यातल्या हवेली कोंढवा इथला रहिवासी आहे. एका बिल्डरकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागून त्याला धमकवण्यासाठी या तिघांनी हा कट रचल्याचं सांगण्यात येत आहे.

दिपक दांडेकर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून दांडेकरच्या वडिलांचे दगड खाणींचे व्यवसाय असल्याने त्याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती. साठे आणि दांडेकर यांच्यावर मोठे कर्ज होते. कळंबोली येथे ठेवलेल्या बॉम्बव्यतिरिक्त पोलिसांना आणखी एक बनवून ठेवलेला बॉम्ब तपासा दरम्यान हाती लागला. सुशील याने हा बॉम्ब ठेवला होता.
Conclusion:

हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याद्वारे त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. चित्रीकरणामध्ये संबंधित आरोपीने डोक्यावर टोपी घातली होती. स्वत:चा चेहरा कॅमेऱ्यामध्ये येणार नाही याची काळजी त्याने घेतली आहे. पण तरीही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.