रायगड - जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अपघाताची मालिका सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. कार्तिकी एकादशीला गेलेल्या पंढरपूरहून परतणाऱ्या मिनीबसला आड गावाच्या हद्दीत आंबेनळी घाटात झाडाला धडक देऊन अपघात झाला. या अपघातात खेड तालुक्यातील खवटी येथील १९ वारकरी प्रवासी जखमी झाले आहेत.
हेही वाचा... सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून ४ घरफोड्या, तर एका दुकानातील मुद्देमाल लंपास
खेड तालुक्यातील खवटी गावातील नागरिक कार्तिकी एकादशी निमित्त मिनीबसने (एमएच 04/ एफके 1643) पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले होते. विठ्ठल राखुमाईचे दर्शन घेऊन सर्व प्रवासी खेडकडे निघाले होते. मिनीबस आंबेनळी घाटात आड गावाच्या हद्दीत आली असता चालकाच्या चुकीच्या दिशेने बस चालवितान बसवरील नियंत्रण सुटून आंब्याच्या झाडाला धडकली. अपघातात बसमधील 19 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पोलादपूर रुग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाच्या चुकीच्या दिशेने गाडी चालविण्याने हा अपघात झाला आहे.