ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी रायगड बस डेपो सज्ज.. कोकणात जाणार 1 हजार 300 बसेस - गणेशोत्सवासाठी कोकणासाठी जादा बसेस

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी रायगड जिल्ह्यातून 1 हजार 300 बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. या गाड्यांव्यतिरिक्त पुढे गरज लागल्यास आणखी 150 बसेस सोडण्याचे नियोजन राज्य परिवहन विभागाने केले आहे.

ganesh festival
ganesh festival
author img

By

Published : Sep 5, 2021, 5:18 PM IST

पेण-रायगड (देवा पेरवी) - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी रायगड जिल्ह्यातून 1 हजार 300 बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. या गाड्यांव्यतिरिक्त पुढे गरज लागल्यास आणखी 150 बसेस सोडण्याचे नियोजन राज्य परिवहन विभागाने केले आहे. गणेशोत्सासाठी पाठविण्यात येणाऱ्या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याचे कामही सुरू आहे. अशी माहिती रायगड विभागाच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

गरज पडल्यास आणखी 150 बसेस सोडणार -

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई, ठाणे, गुजरात, नवी मुंबई सारख्या महानगरातून गणेश भक्त कोकणात दाखल होत असतात. ही बाब लक्षात घेऊन रायगडच्या राज्य परिवहन विभागाने यंदा विशेष तयारी केली आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रायगड जिल्ह्यातून 1 हजार 300 बसेस सोडल्या जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढे गरज पडल्यास आणखी 150 ते 200 गाड्या सोडण्याचे नियोजन राज्य परीवहन विभागाने सुरु केले आहे.

हे ही वाचा - Teacher's Day Special : एक शिक्षक असेही.. कधी मनपाच्या शाळांना मिळत नव्हते विद्यार्थी, आज प्रवेश देण्यासाठी नाही जागा

यातील 8 सप्टेंबरला सर्वाधिक साडे आठशे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. कर्नाळा, रामवाडी, सुकेळीखिंड, वाकणफाटा, लोणेरे आणि कशेडी घाटात एसटी महामंडळाची दुरुस्ती पथके तैनात ठेवली जाणार आहेत. याशिवाय रोहा आणि माणगावची फिरती दुरुस्ती पथके महामार्गावर उपलब्ध राहणार आहेत. दोन खासगी हॉटेलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष थांबेही देण्यात आले आहेत.

हे ही वाचा -तरुणीच्या नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'हनीट्रॅप', दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींचा गंडा

सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्याच्या सुरक्षेसाठी रायगडच्या राज्य परिवहन विभागाने खबरदारीची पावले उचलली आहेत. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या दृष्टीने सर्व बसेस निर्जंतुकीकरण केल्या जात आहेत. यात महत्वाचे म्हणजे नव्या पद्धतीचा अवलंब करून सर्व बसेस अँटी बॅक्टेरियल स्प्रेने निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. अशी माहिती रायगड विभागाच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी रायगड विभाग सज्ज -

गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने रायगड विभाग हा सज्ज झाला आहे. प्रवाशाच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास हा सुखकारक व आनंददायी व्हावा यासाठीही खबरदारी घेतली आहे. 1,300 बसेसची बुकिंग झाली आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 150 बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. अशी माहिती रामवाडी-रायगडच्या वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.