ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून खून

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापकीर चौक येथे शुभम नखाते याच्यावर अज्ञात तरुणांनी कोयत्याने वार करून खून केली. ही घटना बुधवारी रात्री 9 च्या सुमारास घडली.

youth killed
शुभम जनार्धन नखाते
author img

By

Published : Aug 20, 2020, 2:14 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना उघड झाली आहे. शुभम जनार्धन नखाते, असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी वाकड पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. वाकड पोलिसांनी या घटनेची दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापकीर चौक येथे शुभम नखाते याच्यावर अज्ञात तरुणांनी कोयत्याने वार करून खून केली. ही घटना बुधवारी रात्री 9 च्या सुमारास घडली. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती वाकड पोलिसांनी दिली असून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशी वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिली आहे.

या प्रकरणी अद्याप मुख्य आरोपी कोण आहे हे समजले नसून तपास सुरू आहे. या घटनेत आणखी आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वाकड पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.