ETV Bharat / state

Wrestler Abhijeet Katke : हिंदकेसरी अभिजीत कटके याच्यासोबत खास बातचीत...राज्यसरकारबाबत व्यक्त केली ही खंत...

हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान अभिजीत कटकेने (Wrestler Abhijeet Katke) खुल्या गटातून हिंदकेसरी खिताब (Honored with Hindkesari Khitab) पटकावला. अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केला. यासाठी पुण्यातील तालमीत त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

author img

By

Published : Jan 10, 2023, 5:57 PM IST

Wrestler Abhijeet Katke
हिंदकेसरी अभिजीत कटके
प्रतिक्रिया देतांना पैलवान अभिजीत कटके

पुणे : महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटकेने (Wrestler Abhijeet Katke) आता हिंदकेसरी खिताब (Honored with Hindkesari Khitab) पटकावला आहे. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळवला आहे. अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केला. आज कटके पुण्यातील तालीम मध्ये दाखल झाला असून; तालमीत त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

Wrestler Abhijeet Katke
हिंदकेसरी अभिजीत कटके

हिंद केसरी किताब पटकावला : अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचं दिसून येत आहे. 2017 साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके यांनी स्पर्धा जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता. तसेच त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मिळाल होतं आणि आत्ता त्याने 'हिंद केसरी' हा किताब देखील पटकावला आहे.

Wrestler Abhijeet Katke
हिंदकेसरी अभिजीत कटके

राज्यसरकार बाबत व्यक्त केली खंत : यावेळी कटके याच्याशी बातचीत केली असता तो म्हणाला की, 'मी या स्पर्धेची खूप तयारी केली होती. मागच्या वेळी हिंद केसरी स्पर्धेत फायनल मध्ये हारलो होतो. आत्ता पूर्ण तयारी केली होती आणि हिंद केसरी झाल्याने खूप आनंद होत आहे. पण हिंद केसरी झालो असलो तरी जेव्हा ही स्पर्धा जिंकली, तेव्हा तेलंगणा येथील खासदारांनी माझा सत्कार करत बक्षीस दिलं. पण अजूनही राज्य सरकार कडून कोणताही आमंत्रण देण्यात आलेला नाही. नोकरी बाबत अजूनही काहीही बोलणं झालेलं नाही, अशी खंत यावेळी कटके याने बोलून दाखवली.

Wrestler Abhijeet Katke
हिंदकेसरी अभिजीत कटके

कोच जगमाल सिंह : यावेळी कटके याचे कोच जगमाल सिंह याच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, आमच्या हरियाणा येथे मेडल जरी मिळालं तरी नोकरी दिली जाते. आत्ता महाराष्ट्र सरकारने अभिजीत कटके यांना लवकरात लवकर नोकरी द्यावी. कारण तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय चौधरी याला डीवायएसपी ही नोकरी देण्यात आली आणि आत्ता तर अभिजीत कटके याने हिंदकेसरी हा किताब पटकावला आहे. त्यामुळे त्याला प्रधान्याने नोकरी देण्यात, यावी अशी मागणी देखील यावेळी जगमाल यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.