ETV Bharat / state

'लॉकडाऊन'मध्येही दुर्गंधीच्या ढिगाऱ्यार 'ती' शोधते सुगंध - Pune latest news

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सर्वजण घरात सुरक्षित राहत असताना या कचरा वेचणाऱ्यांकडे शासकीय अधिकारी, नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.

Rajgurunagar
राजगुरुनगर
author img

By

Published : Apr 7, 2020, 2:03 PM IST

पुणे - राजगुरुनगरमधील पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या कचरा डेपोत चांडोली गावाच्या कातकरी वस्तीतील मुले आणि महिला प्लास्टिक शोधत आहेत. लॉकडाऊनच्या काळात गरिबांच्या जेवणाची व्यवस्था सामाजिक संस्थांकडून करण्यात आली आहे. मात्र, तरीही हक्काचे व कष्टाचे अन्न मिळवण्यासाठी महिला आणि तरूण या ठिकाणी प्लास्टिक शोधत असल्याचे समोर आले आहे.

'लॉकडाऊन'मध्येही दुर्गंधीच्या ढिगाऱ्यार 'ती' शोधते सुगंध

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सर्वजण घरात सुरक्षित राहत असताना या कचरा वेचणाऱ्यांकडे शासकीय अधिकारी, नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, राजगुरुनगर शहरातून गोळा होणारा रोजचा ओला-सुका कचरा पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या मागील जागेत जमा होतो. त्या ठिकाणाहन या कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यासाठी दुसरीकडे नेला जातो. हे सर्व होत असताना येथे कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे या दुर्गंधीने पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.