बारामती - बारामती येथे महिलेच्या तक्रारीवरून पाच सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला ( Woman Complaint Filed Against Five Lenders ) आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून, बारामती सत्र न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली ( Baramati Session Court Custody Lenders ) आहे. संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी ( रा. बारामती ) व अळणुरे ( रा. परभणी ) अशी गुन्हा दाखल केलेल्या सावकारांची नावे आहेत.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती बबन सातपुते ( रा. रिया आपारमेंट भिगवन रोड बारामती ) यांनी २०२१ मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू केली होती. कंपनी सुरू करताना तिच्या पतीने संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी व अळणुरे या सावकारांकडून दर महिना पाच टक्के व्याजाने एक करोड नऊ लाख रुपये घेतले होते. या सर्वांची बरीचशी रक्कम व्याजासहित कारखाना सुरू असताना परत केली आहे. परंतु, दुर्दैवाने त्यांच्या कारखान्याला ३ मे २०२१ ला आग लागली आणि त्यामध्ये त्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बाकीची रक्कम ते परत देऊ शकले नाही. त्यानंतर वरील सर्व सावकारांनी त्यांना व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली.
इन्शुरन्स मिळाल्यानंतर राहिलेली रक्कम देतो, अशी विनंती करून सुद्धा ते तक्रारदार व त्यांच्या पतीला त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासापोटी तक्रारदार महिलेचे पती १७ एप्रिल रोजी घरातून निघून गेलेले आहेत. ते घरातून निघून गेलेले असताना सुद्धा यातील आरोपी पोपट थोरात हा तक्रारदार महिला घरात असताना बूट घालून घरात गेला. तिला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. व्याजासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सदर महिलेने शेवटी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेचे पती अद्याप घरी आलेले नाही. याबाबत पोलिसांनी खातरजमा करून वरील सर्व आरोपींच्या विरोधात सावकारी अधिनियम कलम प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
त्यानंतर यातील आरोपी पोपट थोरात व संजय बोरकर यांना तात्काळ अटक केली आहे. बुधवारी (दि. २०) पासून चार दिवस वरील दोघांना पोलीस कोठडी जिल्हा सत्र न्यायालयाने दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे पोलीस उपनिरीक्षक घोडके तसेच पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, शिंदे, इंगोले, यांच्या मदतीने करत आहेत.
हेही वाचा - Sanjay Raut Nagpur Tour : विदर्भात शिवसेनेची ताकद वाढणार ? संजय राऊत नागपूर दौऱ्यावर