पुणे- २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू होणार आहे. याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात नाईट-लाईफची संकल्पना राबवू शकतो, असे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे हे पिंपरी-चिंचवडमध्ये हृदयनाथ मंगेशकर यांच्या सर्जा हॉटेलच्या उद्घाटना प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंगेशकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात नाईट-लाईफ ही संकल्पना राबवू शकतो. मात्र, त्यासाठी असा प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईमध्ये अनेक नागरिक हे २४ तास मेहनत करत असतात. तेव्हा अनेकांना खायचे कुठे, असा प्रश्न पडतो, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबाच्या आठवणींना उजाळा देत गेली ५०-६० वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत असून मी त्यांचा नातू आहे, असे म्हणत आशीर्वाद देण्याइतका मोठा नसल्याचे ते म्हणाले.
सगळ्यात अगोदर आदित्य ठाकरे यांनी मांडली होती नाईट-लाईफची संकल्पना
सगळ्यात अगोदर आदित्य ठाकरे यांनी नाईट-लाईफची संकल्पना मांडली होती. तेव्हा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. नाईट-लाईफ हे आदित्य यांचे स्वप्न होते. दरम्यान, २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये नाईट-लाईफ संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये मॉल आणि व्यवसाय हे २४ तास सुरू राहणार. मात्र, खऱ्या अर्थाने ही संकल्पना कधी अमलात येणार हे महत्वाचे आहे.
हेही वाचा- टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरूवात; लहानग्यांपासून वयोवृद्ध नागरिकांचा मोठा सहभाग