ETV Bharat / state

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस अन् राज ठाकरे एकत्र आले तर....- अजित पवार - Ajit Pawar

गेल्या काही दिवसापासून भाजप, बाळासाहेबांची शिवसेना ( Shiv Sena of Balasaheb ) मनसे यांची जवळील खूप वाढली आहे. याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी पवार ( State Opposition Leader Ajit Pawar ) यांना विचारले असता पवार म्हणाले, एकनाथ शिंदे,( Chief Minister Eknath Shinde ) देवेंद्र फडणवीस, ( Devendra Fadnavis ) राज ठाकरे ( Raj Thackeray )एकत्र आले तर, तुम्हाला का वाईट वाटते असा प्रतिप्रश्न प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. दिवाळीच्या काळात सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, त्यात लगेच बातमी करायचे काय कारण आहे, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Oct 22, 2022, 9:58 PM IST

बारामती - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( Maharashtra Navnirman Sena ) दिपोत्सवानिमित्त ( Maharashtra Navnirman Sena Dipotsav ) दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) हे तिघेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसापासून भाजप, बाळासाहेबांची शिवसेना ( Shiv Sena of Balasaheb ) मनसे यांची जवळील खूप वाढली आहे. याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी पवार ( State Opposition Leader Ajit Pawar ) यांना विचारले असता पवार म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे एकत्र आले तर, तुम्हाला का वाईट वाटते असा प्रतिप्रश्न प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. दिवाळीच्या काळात सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, त्यात लगेच बातमी करायचे काय कारण आहे, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

पवार म्हणाले, अतिवृष्टीने बळीराजाचे जे नुकसान झाले आहे, त्याला तातडीने मदत झाली तरच त्याचा उपयोग होईल. ५० हजारांची मदत करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, त्या बद्दल सरकारचे आभार. मात्र मागणी करुनही जे निर्णय होत नाही, त्या बद्दल मी खेद व्यक्त करतो. अशी तीव्र भावना पवार यांनी व्यक्त केली. शंभर रुपयात शिधा देण्याची योजना चांगली असली तरी त्यात लक्ष देण्याची गरज आहे. तर कोणत्या कार्डधारकांना हा शिधा मिळणे अपेक्षित आहे, याबाबत निकष अधुरे असल्याचे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यांना बोलून दाखविले आहे.

शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करू नका- आशिष शेलार यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता, यावर अजित पवार म्हणाले, राजकारण करण्यासाठी लोकसभा, विधानसभा अन्य अनेक ठिकाणी आहेत. आम्ही कधीच खेळात राजकारण करत नाही विनाकारण शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करू नका, अशी अपेक्षा यावेळी पवारांनी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा - दिव्यांच्या प्रकाशाचा सण दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील रोषणाईच्या प्रकाशात समाजातलं अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेचा अंध:कार दूर होवो. प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवरची महाराष्ट्राची वाटचाल अखंड राहो. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, आरोग्य अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल राहो. बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांचा हातभार लागो. सर्वांच्या हातून सत्कर्म घडो. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा मुक्त वातावरणात साजरा होत असलेला दिवाळीचा सण समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन आनंद, उत्साहाच्या वातावरणात साजरा करुया..." अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ajit Pawar
फडणवीस, राज ठाकरे एकत्र आले तर, तुम्ही का दु:खी होता - अजित पवार

मतभेद आनंदानं, उत्साहानं साजरी करुया दिवाळी - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, "दिवाळी हा सर्वांनी एकत्र येऊन कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवारासोबत साजरा करायचा सण आहे. कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांचीही दिवाळी गोड, आनंदी करण्याचा प्रयत्न करावा. समाजात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करावा." राष्ट्रवादी कांग्रेस पक्षासह अनेक संस्था, संघटना आणि व्यक्ती त्यांच्या स्तरावर दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरीब, दुर्बल घटकांपर्यंत दिवाळीचा फराळ, नवीन कपडे पोहचवण्याचा उपक्रम राबवतत आहेत. अनेक संस्था सीमेवरील सैनिकांपर्यंत दिवाळीचा फराळ आणि कृतज्ञतेच्या भावना पोहचवत आहेत. यातूनंच समाजात एकता, बंधुता, आपुलकीचा भावना वाढीस लागणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी अशा संस्थांचे अभिनंदन केले आहे. यंदाची दिवाळी ही मनातील द्वेष, कटुता, असूया, मनभेद, मतभेद दूर सारुन सर्वांनी एकदिलानं, आनंदानं, उत्साहानं साजरी करुया, असं आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.