ETV Bharat / state

जशास तसे उत्तर देऊनच पाकिस्तानचे आव्हान संपवावे लागेल - हेमंत महाजन ब्रि. (नि) - mahajan agreed with rajnath singh statement against pakistan

१९४७ साली काश्मीर जेव्हा भारतात विलीन झाला होता. तेव्हा संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात होता. मात्र, पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरचा काही भाग ताब्यात घेतला. त्यानंतर भारतीय सैन्याने देखील प्रतिहल्ला करून हा भाग परत घेण्याचा प्रयत्न केला. पण तत्कालीन सरकारने सैन्याला थांबण्यास भाग पाडले. कारण त्यांना पाकिस्तानसोबत मैत्री करायची होती. मात्र, तसे  झाले नाही. त्यामुळे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पंचकुलातील पाकिस्तान बद्दलची भूमिका ही योग्य असल्याचे महाजन यांनी सांगितले.

ब्रि. (नि) हेमंत महाजन
author img

By

Published : Aug 18, 2019, 7:47 PM IST

पुणे - पाकिस्तानने आजवर मुत्सद्देगिरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. त्यांच्यात युद्ध करण्याची क्षमता नाही. त्यामुळे ते भारतात दहशतवादी पाठविण्याचा प्रयत्न करतील. सीमेवर गोळीबार करतील. त्यामुळे येणाऱ्या काळात पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊनच त्याला मात द्यावी लागेल, असे मत ब्रिगेडिअर (नि.) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

ब्रि. (नि) हेमंत महाजन

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हरयाणातील पंचकुला येथे पाकिस्तानचा समाचार घेतला होता. यापुढे पाकिस्तानसोबत जी काही चर्चा होईल ती पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावर विश्लेषण करताना महाजन यांनी सदरील प्रतिक्रिया दिली.

महाजन म्हणाले, १९४७ साली काश्मीर जेव्हा भारतात विलीन झाले होता. तेव्हा संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात होता. मात्र पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरचा काही भाग ताब्यात घेतला. त्यानंतर भारतीय सैन्याने देखील प्रतिहल्ला करून हा भाग परत घेण्याचा प्रयत्न केला. पण तत्कालीन सरकारने सैन्याला थांबण्यास भाग पाडले. कारण त्यांना पाकिस्तानसोबत मैत्री करायची होती. मात्र, तसे झाले नाही.

त्यानंतर १९६२, १९७१ आणि १९९९ साली पाकिस्तानने काश्मीरवरूनच भारतासोबत युद्ध केले. त्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आज संपूर्ण भारतात पसरला आहे. तो आजही सुरू असून भारताने आजवर पाकिस्तानसोबत वापरलेल्या शांततावादी धोरणामुळे काहीच फरक पडला नाही. ७० वर्षाच्या काळात अनेक पंतप्रधानांनी प्रयत्न केले. मात्र, ते वाया गेले आहेत. त्यामुळे यापुढे हा प्रश्न सोडवायचा असल्यास तो केवळ सैन्याच्या जोरावर करता येईल. म्हणून सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पंचकुलातील पाकिस्तान बद्दलची भूमिका ही योग्य असल्याचे महाजन सांगितले.

Intro:पाकिस्तानने आजवर मुत्सद्देगिरीचा प्रयत्न केला, त्यात ते हरले..त्यांच्यात युद्ध करण्याची क्षमता नाही त्यामुळे आता ते भारतात दहशतवादी पाठविण्याचा प्रयत्न करतील, सीमेवर गोळीबार करतील..त्यामुळे येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर देऊनच पाकिस्तानचे आव्हान संपवावे लागेल..असे मत ब्रिगेडिअर (नि.) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हरयाणातील पंचकुला येथे एका कार्यक्रमात बोलताना यापुढे पाकिस्तानसोबत जी काही चर्चा होईल ती पाकव्याप्त काश्मीरवरच होईल..असा इशारा पाकिस्तानला दिला..त्यावर विश्लेषण करताना महाजन बोलत होते..
Body:महाजन म्हणाले, 1947 साली काश्मीर जेव्हा भारतात विलीन झाले तेव्हा संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात होते..परंतु पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरचा काही भाग ताब्यात घेतला..त्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिहल्ला करून हा भाग परत घेण्याचा प्रयत्नही केला..पण तत्कालीन सरकारने त्यांना थांबण्यास भाग पाडले..कारण त्यांना पाकिस्तानसोबत मैत्री करायची होती...परंतु हे झालं नाही..त्यानंतर 1962, 1971 आणि 1999 साली पाकिस्तानने काश्मीरवरूनच भारतासोबत युद्ध केलं..पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद तर आज संपूर्ण भारतात पसरला..तो आजही सुरू आहे...Conclusion:भारताने आजवर पाकिस्तानसोबत वापरलेल्या शांततावादी धोरणामुळे काहीच फरक पडला नाही..सत्तर वर्षाच्या काळात वेगवेगळ्या पंतप्रधानांनी केलेले प्रयत्न वाया गेले आहेत..त्यामुळे यापुढे हा प्रश्न सोडवायचा तो केवळ सैन्याच्या जोरावर..त्यामुळे
संरक्षणमंत्र्यांनी मांडलेली 'यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा होईल ती केवळ पाकव्याप्त काश्मीर विषयावरचं' ही भूमिका अगदी योग्य असल्याचे महाजन यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.