ETV Bharat / state

Water Supply by Tanker in Pune: पुणे जिल्ह्यात दुष्काळाचं सावट; उन्हाळ्याप्रमाणेच केला जातोय पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा, वाचा सविस्तर

Water Supply by Tanker in Pune : पुणे जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहे. उन्हाळ्याप्रमाणे देखील पावसाळ्यात टँकरने पाणपुरवठा केला जात आहे. याबद्दल अधिक सविस्तर आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Water Supply by Tanker in Pune
जिल्हाधिकारी राजेश देशमुख
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 4:35 PM IST

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची पत्रकार परिषद

पुणे Water Supply by Tanker in Pune : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्ट महिन्यात पावसानं हुलकावणी दिलीय. राज्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय. पुणे जिल्ह्यात अनेक गावात पिण्याच्या पाण्याचं प्रश्न निर्माण झालाय. उन्हाळ्यात जेवढे टँकर जिल्हाभर लागत होते, तेवढ्याच टँकरची गरज आता पावसाळ्यात आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी 44 टँकरने पुरवठा होत होता. तेच चित्र पावसाळ्यात दिसून येतंय. सप्टेंबर महिना उजाडलाय, तरीही जिल्ह्यात 44 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय.

'अशी' आहे पावसाची परिस्थिती : याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी माहिती दिली की, पुणे जिल्ह्यात जून, जुलै, आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला तर, जिल्ह्यात जून महिन्यात 51 टक्के पाऊस झालाय. जुलै महिन्यात 91 टक्के पाऊस झालाय. ऑगस्ट महिन्यात केवळ 40 टक्के पाऊस झालाय. एकूणच मागच्या वर्षाची तुलना केली तर ऑगस्ट महिन्यात 115 टक्के एवढं पाऊस झाला होता. जुलै महिन्यात 145 टक्के एवढा पाऊस झाला होता. यंदा खूप मोठा फरक जून आणि ऑगस्ट महिन्यात पडलाय. 100 महसूल मंडळापैकी 25 महसूल मंडळात कमी पाऊस झाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

धरण साठ्यातील पाणी : तसंच ते पुढे म्हणाले की, कमी झालेल्या पावसामुळे धरण साखळीत देखील पाणी कमी असल्याचं चित्र आहे. एकूणच मुठा खोऱ्यातील धरणांत 27 टीएमसी एवढा साठा आहे. मागच्या वेळी 29 टीएमसी एवढा साठा होता. तर निरा खोऱ्यातील धरण साखळीत 43 टीएमसी एवढा साठा आहे. तर मागच्या वर्षी 48 टीएमसी एवढा साठा होता. तसेच कुकडी खोऱ्यात यंदा 23 टीएमसी एवढा साठा आहे. तर, मागच्या वर्षी 31 टीएमसी एवढा साठा होता. मुठा खोरे सोडलं तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा इतर धरणात कमी प्रमाणात पाण्याचा साठा असल्याचं देशमुख म्हणाले.

टँकरने केला जातोय पाणीपुरवठा : पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती पहिली तर आज 44 टँकर 6 तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत आहे. जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात 13 टँकर सुरू आहे, तर खेड तालुक्यात 8 टँकर आणि जुन्नर तालुक्यात 10, आंबेगाव तालुक्यात 6 आणि पुरंदर तालुक्यात 7 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँक ने पाणी पुरवठ्याबाबत त्या त्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी एकूणच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जिल्ह्यात परिस्थिती आहे.

पिकांबाबत जिल्ह्यातील परिस्थिती : एकूण पीकांबाबत जिल्ह्याची माहिती घेतली तर, कमी पर्जन्यमानामुळे पीक देखील अडचणीत आले असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसत आहे. तसंच खरीप हंगामातील पेरणी देखील अजूनही शंभर टक्के झाली नसल्याचं चित्र जिल्ह्यात आहे. साधारणतः 2 लाख हेक्टर क्षेत्रापैकी यंदा 1 लाख 80 हजार हेक्टर एवढी पेरणी झालीय. दरवर्षीच्या तुलनेत बाजरी आणि मुग, उडीद यांचा पेरा कमी झालेला आहे. यामुळे पीक विम्याबाबत शासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. जवळपास 2 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने विविध योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आहे, अशी माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Maharashtra Weather : मराठवाड्यात पावसाची दडी; शेतकरी अडचणीत, 'या' तालुक्यात भीषण पाणीटंचाई
  2. Maharashtra Drought : राज्यात दृष्काळजन्य परिस्थिती; सरकार केंद्राला करणार 'ही' विनंती
  3. Drought In Beed District: बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती; शेतकरी चिंतेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.