पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन आणि पाऊस असे सत्र सुरू आहे. दिवसा तीव्र उष्णता आणि दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने राज्यातील काही भाग झोडपून निघाले आहे. या बदलत्या वातावरणाचा मात्र, शेती पिकांना फटका बसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आली आहे. तर कमी दाबाचा पट्टा तसेच वाऱ्याची खंडितता मराठवाड्यातून जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भात पाऊसाची तीव्रता ही जास्त असणार आहे. असा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
3 ते 7 मे पर्यंत पावसाची शक्यता: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 7 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे राज्यातील आद्रता कमी होणार आहे. त्यामुळे मेघगर्जनासह पाऊसाचे प्रमाण हे कमी होणार आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात देखील 3 मे ते 7 मे पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता: राज्यातील कोकण गोवा या ठिकाणी पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्यमहाराष्ट्र येथे देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.