ETV Bharat / state

आषाढी वारी विशेष : पुण्यनगरीत वारकऱ्यांची मालिश करून सेवा; हिंदु-मुस्लीम एकतेचे दर्शन

शहरातील पेठासह उपनगरातही राज्यभरातून आलेले वारकरी ठिकठिकाणी मुक्कामाला आहेत. या वारकऱ्यांच्या दिंड्या पारंपरिक नियोजनानुसार मुक्कामाला थांबल्या आहेत. देहू आणि आळंदीहून पायी प्रवास करत वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला येतात आणि पुढच्या मोठ्या पल्ल्याच्या वाटचालीसाठी सज्ज होत असतात.

वारकऱ्यांची मालिश करून सेवा करताना मुस्लिम बांधव
author img

By

Published : Jun 27, 2019, 8:26 PM IST

पुणे - सध्या संपूर्ण शहर वारीमय झाले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये मुक्कामाला आहेत. यावेळी सहकारनगर मधील नवरात्र उत्सव समितीच्यावतीने हिंदु-मुस्लीम बांधवांनी एकतेचे दर्शन घडवत वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून मसाज केला. गेल्या दहा वर्षांपासून येथे येणाऱ्या वारकऱ्यांची निवासव्यवस्था, भोजनाची व्यवस्था समितीच्यावतीने केली जाते.

वारी विशेष : पुण्यनगरीत वारकऱ्यांची मालिश करून सेवा; हिंदु-मुस्लीम एकतेचे दर्शन

शहरातील पेठासह उपनगरातही राज्यभरातून आलेले वारकरी ठिकठिकाणी मुक्कामाला आहेत. या वारकऱ्यांच्या दिंड्या पारंपरिक नियोजनानुसार मुक्कामाला थांबल्या आहेत. देहू आणि आळंदीहून पायी प्रवास करत वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला येतात आणि पुढच्या मोठ्या पल्ल्याच्या वाटचालीसाठी सज्ज होत असतात. वारीत अधिक चालणे होत असल्यामुळे काही वारकऱ्यांचे पाय दुखायला लागतात. त्यामुळे या वारकऱ्यांच्या पायांना मालिश करण्याची सेवा पुण्यात अनेक जण करतात. येथे वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून त्यांचे पाय चोळून देण्याचे काम उत्साहात केले जाते. म्हणून यावेळीसुद्धा सहकारनगर मधील नवरात्र उत्सव समितीच्यावतीने हिंदु-मुस्लीम बांधवांनी एकतेचे दर्शन घडवत वारकऱ्यांच्या पायाची तेल लावून मसाज केली.

माऊलींची आणि तुकोबारायांची पालखी शहरात दाखल झाल्यानतंर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यास पुणेकरांनी गर्दी केली होती. यावेळी विविध मान्यवर, आमदार यांनीही दर्शन घेतले. तर दुसरीकडे विविध संस्थांनी वारकऱ्यांसाठी निवासव्यवस्था, भोजन, पायाला मसाज, चप्पलांची दुरुस्ती करणे, केश कर्तनालय अशा विविध सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करुन पुणेकर उत्साहाने या वारकऱ्यांची सेवा करत आहेत.

Intro:mh pun varkari malish seva special story 2019 pkg 7201348Body:mh pun varkari malish seva special story 2019 pkg 7201348

Anchor
पुणे शहर सध्या वारीमय झाले आहे भक्तीचे वातावरण शहरात असुन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज
यांच्या पालख्या पुणे शहरात मुक्कामाला असल्याने
शहरातील पेठासह उपनगरात ही वारकरी ठिकठिकाणी मुक्कामाला आहेत पुणे शहरात ठिकठिकाणी राज्यातून आलेले वारकरी दिंड्या या पारंपरिक नियोजनानुसार मुक्काम करत असतात आणि या काळात पुणेकर उत्साहाने या वारकऱ्यांची सेवा करत असतात देहू आणि आळंदी हुन पायी प्रवास करत वारकरी पुणे मुक्कामी येतात आणि पुढच्या मोठ्या पल्ल्याच्या वाटचालीसाठी सज्ज होत असतात त्यामुळे या वारकऱ्यांच्या पायांना मालिश करण्याची सेवा पुण्यात अनेक जण करतात वरकर्यांनाच्या पायांना तेल लावून त्यांचे पाय चोळून देण्याचं काम उत्साहात केलं जातं या शिवाय अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सेवा केली जाते, दोन्ही पालख्या शहरात दाखल झाल्यानतंर संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुकाचे दर्शन घेण्यास पुणेकरांनी गर्दी केली होती. यावेळी विविध मान्यवर ,आमदार यांनीही दर्शन घेतले. तर दुसरीकडे विविध संस्थानी वारकरीयांच्यासाठी निवासव्यवस्था,भोजन,पायाला मसाज,चप्पलाची दुरुस्ती करणे,केश कर्तनालय अशा विविध सोयीसुविधा मोफत उपलब्ध करुन दिल्या होत्या सहकारनगर मधील नवरात्र उत्सव समितीच्यावतीेने ही हिंदु-मुस्लीम बांधवानी वारक-याच्या पायाची तेल लावुन मसाज केली. गेल्या दहा वर्षापासुन येथे येणा-या वारक-यांची निवासव्यवस्था ,भोजनाची व्यवस्था समितीच्यावतीने केली जाते.
Byte वारकरी महिलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.