पुणे - जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात विधानसभेसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळपासून पावसाने उघडीप दिली असून मतदार मतदानासाठी बाहेर पडत आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यातील परिसरामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या मतदारसंघांंत राष्ट्रीय नेत्यांनीसुद्धा हजेरी लावत सभा घेतल्या होत्या. तर अपक्ष उमेदवारांनी पक्षिय उमेदवारांपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या चारही विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.