ETV Bharat / state

राजगुरुनगरातील नागरिकांकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन, पोलीसही हैराण - corona cases in pune

राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक व शिरुर-भीमाशंकर अशा दोन्ही मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करत आहेत.

राजगुरुनगरातील नागरिकांकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन

author img

By

Published : Apr 26, 2020, 7:44 AM IST

Updated : Apr 26, 2020, 10:20 AM IST

पुणे - 'नको देवराया अंत आता पाहू,' असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात लॉकडाऊन असतानाही नागरिक काहीतरी कारण काढून बाहेर पडत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पोलीस कधी नागरिकांची समजूत काढत आहेत तर, कधी भर रस्त्यात हात जोडत आहेत.

पोलिसांच्या इतक्या प्रयत्नांनंतरही नागरिक काही ऐकायला तयार नसल्याचे चित्र पुणे-नाशिक महामार्ग आणि शिरुर-भीमाशंकर मार्गावर पाहायला मिळत आहे. राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक व शिरुर-भीमाशंकर अशा दोन्ही मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करत आहेत.

राजगुरुनगरातील नागरिकांकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन

नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य सांगून पोलीस थकले, मात्र नागरिकांना कोरोनाचे भय राहिले नाही. राजगुरुनगर शहरातील अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीही नागरिक पर्यायी छोट्या रस्त्यांवरुन महामार्गावर येत आहेत. पोलीस दल कमी असतानाही पोलीस आपले कर्तव्य पार पाडतात आणि राजगुरुनगर नगरपरिषद मात्र पोलिसांच्या मदतीला उभी राहात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे, 'नको देवराया अंत आता पाहू,' असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

Last Updated : Apr 26, 2020, 10:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.