ETV Bharat / state

​पुण्यात मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल, मतदान केंद्रावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामुळे मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

​पुण्यात मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Oct 21, 2019, 3:51 PM IST

पुणे - संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र, या ठिकाणी मतदानावेळी अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामुळे मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

हेही वाचा - मतसंग्राम : विखे-थोरात कुटुंबीयानी बजावला मतदानाचा हक्क

मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच मतदान करताना मोबाईल जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे. मात्र, असे असूनही ही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये आपण मतदान करतानाचे हे व्हिडिओ शूट केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यातून या मोबाईल बंदीचा फारसा काही फायदा झाला नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

हेही वाचा - दिवस मतसंग्रामाचा : माजी मंत्री खडसेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Intro:पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या
व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. Body:मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. आणि मतदान करताना मोबाईल जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे. परंतु असे असूनही ही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईल मध्ये आपण मतदान करतानाचे हे व्हिडिओ शूट केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. Conclusion:अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनीही मोबाईल बंदी घातली आहे परंतु काही अति उत्साही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून मोबाईल मतदान केंद्राच्या आत घेऊन जात आहेत. यातून या मोबाईल बंदीचा फारसा काही फायदा झाला नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.