पुणे: कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) या बऱ्याच दिवसांपासून आजारीहोत्या त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू होते. आज ( शनिवार ) सकाळी जास्त त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यात आले; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार -
रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला. ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला. संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने बहरून येईल असा विश्वास त्या नेहमी व्यक्त करायच्या. २०१८ साली पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वयाच्या दहाव्या वर्षी केला कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर प्रवेश
जयराम आणि जयमाला या दाम्पत्याची कीर्ती या मुलगी होत. कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमिवर प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तब्बल 6 दशके रंगभूमीवर आपले अधिराज्य गाजवले. मराठी रंगभूमीसाठी कीर्ती यांनी अनमोल असे योगदान दिले आहे.
-
ज्येष्ठ अभिनेत्री,शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनानं मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी सुरेल गायन,अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/oBtiIaBZco
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ज्येष्ठ अभिनेत्री,शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनानं मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी सुरेल गायन,अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/oBtiIaBZco
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2022ज्येष्ठ अभिनेत्री,शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनानं मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी सुरेल गायन,अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/oBtiIaBZco
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2022
'महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी'
कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. 'कीर्तीताईंच्या निधनामुळं मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावन्या व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - Ex IPS A A Khan Dies At 81 : एन्काऊंटर स्पेशलिस्ट माजी आयपीएस अधिकारी ए. ए. खान यांचं निधन