ETV Bharat / state

‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

author img

By

Published : Feb 5, 2021, 12:23 AM IST

‘करायला गेलो एक’ या नाटकाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिका गाजली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातही त्यांनी काम केले.

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

पुणे - ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. कडकोळ हे त्यांनी झपाटलेला आणि झपाटलेला 2 या चित्रपटातून साकारलेल्या ‘बाबा चमत्कार’ या व्यक्तिरेखेमुळे ते अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते.

लष्करात भरती होण्याची इच्छा असलेल्या कडकोळ यांना मेडिकल प्रॉब्लेममुळे जाता आले नाही. दरम्यान त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी नाटकांमध्ये लहान सहान भूमिका करायला सुरुवात केली. ‘करायला गेलो एक’ या नाटकाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिका गाजली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातही त्यांनी काम केले होते.

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ
ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ

बाबा चमत्कार अजरामर पात्र-

कडकोळ यांनी ‘ब्लॅॅक अॅन्ड व्हाईट’, ‘कुठे कुठे शोधू मी तिला’, ‘गौरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटामधून काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले होते. झपाटलेला हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू या पात्रांसोबतच बाबा चमत्कार हे पात्र देखील चांगलेच प्रसिद्ध झाले होते. कडकोळ यांनी साकारलेले बाबा चमत्कार हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.