पुणे - शिवाजीनगर भागातील मॉर्डन महाविद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेतील वाहने पेटल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची ३ वाहने दाखल झाली होती. पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या या गाड्यांना आग लागली आहे. या आगीत जवळपास ३० वाहने जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पुणे पोलिसांनी जप्त केलेली ३० पेक्षा अधिक वाहने जळून खाक..!
पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या या गाड्यांना आग लागली आहे. या आगीत जवळपास ३० वाहने जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पुणे
पुणे - शिवाजीनगर भागातील मॉर्डन महाविद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेतील वाहने पेटल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची ३ वाहने दाखल झाली होती. पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या या गाड्यांना आग लागली आहे. या आगीत जवळपास ३० वाहने जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
डेक्कन वाहतूक विभागाचे जंगली महाराज रस्त्यावर मॉडर्न महाविद्यालयाच्या रस्त्यावर कार्यालय आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करून वाहने आणतात. त्याठिकाणीही वाहने ठेवली जातात. त्यानंतर नागरिक म्हणजे वाहन चालक येऊन दंड भरून वाहने घेऊन जातात. दरम्यान, आज दुपारी याठिकाणी भंगार साहित्याला आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात लागली होती अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आणि 1 पाण्याचे टँकरने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आहे. या आगीत जवळपास ३० वाहने जळून खाक झाल्याचे समोर आले आहे.
आग कशामुळे लागली कारण अद्याप अस्पष्ट
शिवाजीनगर भागातील मॉर्डन महाविद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत वाहतूक पोलिसानी ताब्यात घेतलेल्या दुचाकी, रिक्षा आणि चार चाकी वाहनांना आग लागल्याची माहिती पावणे चार वाजेत्या सुमारास आम्हाला मिळाली. त्यानंतर काही क्षणात अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी गाड्या दाखल झाल्या. घटनास्थळी जवळपास १०० हून अधिक गाड्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाड्यांच नुकसान होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता पाण्याचा चारही बाजूने मारा केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तरी देखील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी अशी एकुण ३० हून अधिक वाहनं आगीत जळून खाक झाली आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप सांगता येणार नाही.