ETV Bharat / state

पिंपरी पोलीस ठाण्याच्या पटांगणातील वाहनांना लागली अचानक आग; 15 वाहने जळून खाक

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याच्या पटांगणात असलेल्या वाहनांना अचानक भीषण आग लागली. या आगीत 15 वाहने जळून खाक झाली आहेत. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.

Vehicles caught fire in pimpri police station
पिंपरी पोलीस ठाण्याच्या पटांगणातील वाहनांना लागली अचानक आग; 15 वाहने जळून खाक
author img

By

Published : Nov 9, 2020, 7:19 PM IST

पुणे - पिंपरी पोलीस ठाण्याच्या पटांगणात असलेल्या वाहनांना अचानक भीषण आग लागली. या आगीत 15 वाहने जळून खाक झाली आहेत. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

आगीची माहिती अग्निशमन विभागाने दिली असून यात जीवितहानी झालेली नाही. मात्र यात 15 वाहन जळून खाक झाली आहेत. त्यात 13 कार आणि दोन रिक्षांचा समावेश आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या पटांगणात जप्त करण्यात आलेली शेकडो वाहन आहेत. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वाहनांना भीषण आग लागली. काही क्षणात 15 वाहन जळून खाक झाली. पिंपरी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. तर अग्निशमन विभागाच्या तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

हेही वाचा - आगीत अडकलेल्या कुटुंबाची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका

हेही वाचा - शिरुर प्रकरण : 6 दिवसांनंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.