ETV Bharat / state

Varun Sardesai Criticized BJP : भाजपकडून घाणेरडे आणि नीच स्वरूपाचे राजकारण करीत आहे : वरुण सरदेसाई

नागपूर येथील अधिवेशनात युवा सेना सचिव वरुण सरदेसाई ( Varun Sardesai Strongly Criticized BJP ) यांच्यावर भाजप आमदार योगेश सागर ( BJP Dirty and Low Level Politics ) यांनी काल आरोप केले होते. त्याच्या पुराव्यासाठी एक पेनड्राईव्हही सादर केला होता. हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड नावाची कंपनी स्थापन करून मुलांची फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला. यावर युवा सेना सहसचिव वरुण सरदेसाई यांनी पुण्यात आज शिवसेना भवन येथे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

author img

By

Published : Dec 31, 2022, 11:01 PM IST

Varun Sardesai Strongly Criticized BJP Saying That BJP is Doing Dirty and Low Level Politics
भाजपकडून घाणेरडे आणि नीच स्वरूपाचे राजकारण करीत आहे : वरुण सरदेसाई

पुणे : भाजप आमदार योगेश सागर यांनी केलेल्या ( Varun Sardesai Strongly Criticized BJP ) आरोपावर, युवा सेना सहसचिव वरुण सरदेसाई यांनी स्पष्टीकरण देत, अशी कोणतीही ( BJP Dirty and Low Level Politics ) फसवणूक मी केलेली नसून ( Yuva Sena Joint Secretary Varun Sardesai ) अधिवेशनाच्या काळात महविकास आघाडीकडून सत्ताधारी पक्षातील 6 आमदारांचे घोटाळे पुरव्यासहित सादर केल्याने, असे खोटे आरोप आमच्यावर करण्यात येत असून, भाजप घाणेरडे आणि नीच स्वरूपाचे राजकारण सध्या करीत आहे, असे यावेळी सरदेसाई यांनी सांगितले.

भाजप आमदार योगेश सागर यांनी केलेले आरोप विधिमंडळ अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार योगेश सागर यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप सादर करत पेनड्राईव्ह दिला आहे.यात सरदेसाई यांनी हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड नावाची कंपनी स्थापन करुन मुलांची फसवणूक केली आहे. वरुण सरदेसाई या कंपनीचे अध्यक्ष आहेत. या कंपनीने मुलांची मोठी फसवणूक केली आहे. शाळेत स्काऊट शिक्षक म्हणून नोकरी देत केली विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक.

कंपनीने गरीब मुलांकडून प्रत्येकी 8- 10 लाख रुपये घेतले या कंपनीने गरीब मुलांकडून 8- 10 लाख रुपये प्रत्येकी घेतले. ट्रेनिंग देऊन शाळांमध्ये स्काऊटसाठी नोकरी देऊ, असे या कंपनीने तरुणांना सांगितले होते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेत विकून पैसे दिलेत. ट्रेनिंगसाठी गोंदियाला पाठवले. त्यांना एकेक पत्र देऊन शाळांना पाठवले गेलं. पण अशी कोणतीही नोकरी दिली नसल्याचे त्या शाळांनी सांगितले. हे पैसे वरुण सरदेसाईंना दिल्याचे सांगण्यात आले आहे. ती मुले मुख्यमंत्र्यांना भेटायला गेली होती. त्यानंतर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटलात आता तुम्ही जे करायचे ते करा, आमच्याकडून पैसे परत मिळणार नाहीत, असे संभाषण त्यांच्याद्वारे करण्यात आले. ते या पेनड्राइव्हमध्ये आहे.

वरुण सरदेसाईंने आरोप फेटाळून दिले स्पष्टीकरण यावर सरदेसाई म्हणाले की हिंदुस्तान स्काऊट अॅण्ड गाईड ही संस्था जगातील १०० हून अधिक देशांत मदत आणि पुनर्वसनसंदर्भात प्रशिक्षण देते. जुलै २०२१ चिपळूणला अतिवृष्टी झाली होती. यावेळी अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनासाठी राज्यभरातील अनेक संस्थांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा हिंदुस्तान स्काऊट अॅण्ड गाईड ही केंद्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या संस्थेचे अध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी मला या संस्थेचे अध्यक्षपद घेण्याची विनंती केली.

वरुण देसाईंनी सांगितले कंपनीचे काम महाराष्ट्रातील कोणत्याही भागात अतिवृष्टी किंवा इतर कोणतीही आपत्ती ओढावल्यास बाधितांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी या संस्थेकडून प्रशिक्षण दिलं जाईल. म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये मी हिंदुस्तान स्काऊट अॅण्ड गाईड महाराष्ट्राचं अध्यक्षपद स्वीकारलं. ज्या मुलांचं नाव घेऊन माझ्यावर आरोप करण्यात येत आहे.त्या मुलांना मी ओळखत देखील नाही.आणि त्यांना कधी भेटलो देखील नाही.आमदार योगेश सागर यांनी बाहेर येऊन माझ्यावर आरोप करावे.मी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करेल असं यावेळी सरदेसाई यांनी सांगितल.

केंद्र शासनासह राज्याचीदेखील या कंपनीला/संस्थेला मान्यता तसेच ही संस्था केंद्र शासन मान्यता प्राप्त असून मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राज्यानेही या संस्थेला मान्यता दिली. १८ नोव्हेंबर २०२१ महाराष्ट्राने मान्यता दिली.या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून सव्वावर्षाचाच कालावधी झाला आहे. या काळात नागपुरात एकच कॅम्प आम्ही घेतला. हा कॅम्प अत्यंत यशस्वी झाला, असं सांगून या कॅम्पचे फोटोही वरुण सरदेसाई यांनी दाखवले. या कॅम्पदरम्यान, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मदत आणि पुनर्वसन प्रशिक्षण दिलं गेलं. मात्र, माझ्यावर विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात आला. पण सभागृहात योगेश सागर यांनी जी नावे वाचून दाखवली त्यातील एकालाही मी ओळखत नाही. त्यांना मी कधीही संपर्क केलेला नाही. त्यांच्याकडूनही कधी संपर्क झाला नाही. त्यांनी मला कधी पत्र लिहिलं नाही, असंही सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.