पुणे - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागरित्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे.
एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा पुण्यात कमी प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून पुणे शहरातील वाहतूक सुरळीत आहे तर दुकानेही नेहमीप्रमाणे सुरू आहेत.