ETV Bharat / state

परप्रांतीय कामगारांना बेशुद्ध करुन बेदम मारहाण; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल - परप्रांतीय कामगार

पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार केल्यानंतर या तिघांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, कामगारांवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील परप्रांतीय कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

brutally assaulted to provincial workers
परप्रांतीय कामगारांना बेदम मारहाण
author img

By

Published : Mar 28, 2020, 7:47 AM IST

पुणे - शिरुर तालुक्यातील वढु बुद्रुक येथे शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी तीन परप्रांतीय कामगारांना बेशुद्ध करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

अज्ञात व्यक्तीकडून परप्रांतीय कामगारांना बेदम मारहाण

हेही वाचा... 'सांगा, आम्ही जगायचं कसं?', मुंबईतील लाखो बेघरांचा प्रश्न

सध्या कोरोना विषाणूमुळे संपुर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन आहे. या गंभीर परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीय कामगारांची रोजच्या जेवणासाठी तारांबळ होत आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी वढु बुद्रुक येथे काही अज्ञात व्यक्तींनी तीन परप्रांतीय कामगारांवर हल्ला केला. यात कामगारांच्या तोंड आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार केल्यानंतर या तिघांना घरी सोडण्यात आले. मात्र, कामगारांवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील परप्रांतीय कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.