राजगुरुनगर (पुणे) - खेड तालुक्यातील शिरोली येथील खापरदरा डोंगर माळरानावर दोन अज्ञात तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली. ही माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्यासह पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली.
आज सकाळच्या सुमारास शिरोली येथील खापरदरा डोंगरावर गुराखी जनावरांबरोबर गेले. या माळरानावर दोन तरुणांची हत्या झाल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्यासह पोलीस टीम घटनास्थळावर दाखल झाले असून हत्या झालेल्या दोन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. हत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सांगितले आहे
शिरोली येथील थापरदरा माळरानावर हत्या झालेल्या दोन तरुणांसोबत अजूनही व्यक्ती उपस्थित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनास्थळावर धूम्रपान केल्याच्या वस्तू आढळून आल्या आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन तरुणांची हत्या झाल्याने या हत्ये मागचं कारण व हत्या करणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आहे.
पुण्यात दोन तरुणांची हत्या, शिरोली परिसरात खळबळ
शिरोली येथील थापरदरा माळरानावर हत्या झालेल्या दोन तरुणांसोबत अजूनही व्यक्ती उपस्थित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनास्थळावर धूम्रपान केल्याच्या वस्तू आढळून आल्या आहे.