पुणे : राजस्थान पोलिसांनी 30 मार्च 2022 रोजी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस पुत्र बशीर खां शेरानी याला पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआए) ने या संदर्भात गुन्हा दाखल करून अनेकांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून युनूस साकी, इमरान आणि फिरोज पठान हे तिघे फरार होते. आयएसआयएस पासून प्रेरणा घेऊन ही संघटना काम करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमरान खान आणि युनूस साकी याला अटक केली आहे, तर फिरोज पठाण हा फरार झाला आहे, त्याचा शोध सुरू आहे.
न्यायालयाने 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली : याबाबत आरोपीचे वकील यशपाल पुरोहित म्हणाले की, पोलिसांकडून आठ दिवसांची कस्टडीची मागण्यात आली होती. पण न्यायालयाने 25 तारखेपर्यंत कस्टडी दिली आहे. पोलिसांनी काही गोष्टी जप्त केल्या आहेत. तसेच लॅपटॉप आणि पांढऱ्या रंगाच्या गोळ्या सापडल्या आहेत. पोलिसांना ड्रोनचे कव्हर देखील सापडले आहे. याची चौकशी पोलिसांना करायची आहे. कोथरूड पोलिसांच्या 175/2023 या गुन्ह्यात त्यांना हजर करण्यात आले आहे. यात 468, 389, आणि 511 सारखी कलम लावण्यात आले आहेत. तसेच 3/25,37ए आणि 135 महाराष्ट्र पोलीस ॲक्ट सारखी कलमेही लावण्यात आली आहेत. त्यामुळे कमीत कमी पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी आमची मागणी होती. असे यावेळी वकील यशपाल पुरोहित आणि सौरभ मोरे यांनी सांगितले आहे.
दोघांकडे केली चौकशी : याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे 3 वाजाता पेट्रोलिंग करत असताना 3 जण मोटार सायकल चोरी करताना पोलिसांना आढळले. त्यांना चौकशीसाठी घेऊन जात असताना, एक जण पळून गेला. त्या दोघांकडे चौकशी केली असता जिवंत काडतुसे, तसेच वाहन चोरीचे साहित्य, लॅपटॉप आढळून आले. तसेच दोघांची चौकशी केली असता ते राजस्थान प्रकरणात वाँटेड असल्याचे समजले. तर गेल्या 15 ते 16 महिन्यांपासून ते कोथरूड या ठिकाणी रहात होते. त्यांचा साथीदार हा फरार आहे.
हेही वाचा -
- Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली?
- Kashmiri Pandit Murder : काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या; पुलवामातील अचन गावात हत्येचा निषेध
- Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या