पुणे - लोणावळा शहरातील गवळीवाडा येथे फ्री स्टाईल हाणामारी करणाऱ्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहे. सोमवारी (दि. 15 जून) निलंबित पोलीस कर्मचारी व काही तरुणांमध्ये हाणामारी झाली होती. यावेळी पोलिसांनी तरुणांना बेदम मारहाण केली होती, असे सांगण्यात येत आहे.
हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर चौकशी करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जयराज देवकर व माणिक अहिनवे, अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी देवकर आणि अहिनवे हे एका लग्नावरून खासगी वाहनाने शहरात परतत होते. दोघांच्या अंगावर साधे कपडे होते. लोणावळा शहरातील गवळीवाडा येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना हॉर्न वाजवून ही साईड न दिल्याने. त्यांना पोलीस कर्मचाऱ्या यांनी चारचाकीतून बाहेर येऊन जाब विचारला. त्यावेळी वाद निर्माण होऊन त्यांच्यात झटापट झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तरुणांना बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला होता. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील मार लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गंभीर बाब म्हणजे संबंधित निलंबित पोलीस कर्मचारी यांच्यावर या अगोदर देखील काम न करण्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलेल्या होत्या.
हेही वाचा - खासदार सुप्रिया सुळेंकडून रोजगार हमीच्या कामांची पाहाणी, मजुरांशी साधला संवाद