ETV Bharat / state

पेस्ट कंट्रोल बेतले जीवावर, पुण्यात दोघांचा मृत्यू, हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप - pest control,

स्ट कंट्रोल केल्यानंतर २ दिवसांनी घरात येऊन झोपल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अजय बेलदार आणि अनंता खेडकर
author img

By

Published : Mar 7, 2019, 12:46 PM IST

पुणे - पेस्ट कंट्रोल केल्यानंतर २ दिवसांनी घरात येऊन झोपल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अजय बेलदार (२०, जळगाव) आणि अनंता खेडकर (२०, बुलडाणा) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दोघेही कात्रज परिसरातील पी आय महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. हॉटेल मालकाने त्यांना राहण्यासाठी एक खोली घेऊन दिली होती. या खोलीमध्ये ढेकून झाल्यामुळे त्यांनी ३ दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल केले होते. त्यानंतर ते २ दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले आणि मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले होते.

दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला तरी हे दोघे कामावर न आल्याने कॅन्टीन मॅनेजरने त्यांच्या खोलीवर जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर त्याने खिडकीतून डोकावले असता दोघेही निपचित झोपल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही तातडीने भारतीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषीत केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

undefined

या तरुणांच्या नातेवाईकांनी मात्र या दोघांचा मृत्यू पेस्ट कंट्रोलने झाला नसून त्यांचा खून झाल्याचा आरोप केला. याप्रकरणी आम्हाला योग्य ती माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:(Photo FTP, WHATSAPP)
घरात झालेले ढेकूण घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दोन दिवसांनी घरात येऊन झोपल्याने दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अजय बेलदार (२० जळगाव) आणि अनंता खेडकर (२० बुलढाणा) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

Body:भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत दोघेही कात्रज परिसरातील पी आय महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये काम करत होते. हॉटेल मालकाने त्यांना राहण्यासाठी एक खोली घेऊन दिली होती. या खोलीमध्ये ढेकुन झाल्यामुळे त्यांनी तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल केले होते. त्यानंतर ते दोन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले आणि मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले होते.

Conclusion:दरम्यान दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला तरी हे दोघे कामावर न आल्याने कॅन्टीन मॅनेजरने त्यांच्या खोलीवर जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर त्याने खिडकीतून डोकावले असता दोघेही निपचित झोपल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही तातडीने भारतीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी तपासणीअंती दोघांनाही मयत घोषित केले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या तरुणांच्या नातेवाईकांनी मात्र या दोघांचा मृत्यू पेस्ट कंट्रोलने झाला नसून त्यांचा खून झाल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी आम्हाला योग्य ती माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.