पुणे -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात पुण्यातील दोन जण उपचार घेत होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १८४ वर पोहोचली आहे. पुण्यातील घोरपडी पेठ आणि कामगार नगर येरवडा येथील रहिवासी असलेल्या दोघांवर पिंपरी-चिंचवडमहानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहराच्या बाहेरील एकूण ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्याला लागण
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या ते वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारपर्यंत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकही कर्मचारी बाधित नव्हता. तसेच शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र, एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संबंधित कर्मचाऱ्याला लागण झाली आहे.