ETV Bharat / state

आस तुझ्या भेटीची...संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ

12 जूनला देहुनगरीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान झाले होते. परंतु, कोरोनाचा पार्श्वभूमीवर पादुका या मुख्य मंदिरात विसावलेल्या होत्या.

author img

By

Published : Jun 30, 2020, 3:43 PM IST

dehu
संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरकडे रवाना

पुणे (देहू) - टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरात आज दुपारी एकच्या सुमारास जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विशेष एसटी बसने पंढरपूरला मार्गस्थ झाल्या आहेत. यावेळी देहू परिसर हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. मंदिराभोवती पादुका प्रदक्षिणा झाल्यानंतर मुख्य मंदिरातून टाळ मृदंगाच्या गजरात पादुका बाहेर आणल्या होत्या.

12 जूनला देहुनगरीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान झाले होते. परंतु, कोरोनाचा पार्श्वभूमीवर पादुका या मुख्य मंदिरात विसावलेल्या होत्या. त्या आज मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

त्याअगोदर ज्या एसटीमधून पादुका मार्गस्थ होणार होत्या, त्या बसची फुलांनी सजावट केली होती. तसेच सुरक्षेच्या कारणामुळे श्वान पथकाद्वारे संपूर्ण बसची तपासणी करण्यात आली. साडेबाराच्या सुमारास जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका मुख्य मंदिराच्या बाहेर आणत मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या. यावेळी वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य दिसले. टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी पुढे पुढे चालत होते. त्यानंतर मंदिर परिसराच्या बाहेर येताच हरिणामाचा जयघोष वारकऱ्यांनी केला आणि बसच्या दिशेने पादुका मार्गस्थ झाल्या. जगतगुरूंच्या पादुका बसमध्ये विसावल्यानंतर हरिनामाचा जयघोष करत एसटी बस पंढरपूरला मार्गस्थ झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.