पुणे - पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर एका मालवाहु ट्रकने जोरात धडक दिल्याने एक कंटेनर २० फूट खोल खड्ड्यात जाऊन पडला. ही घटना गहुंजे क्रिकेट स्टेडियमजवळ पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने कंटेनर चालक बचावला असून ट्रक चालक मात्र फरार झाला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर गहुंजे क्रिकेट स्टेडियमजवळ पहाटे ४ च्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कंटेनरला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गालगत असलेल्या नाल्यातील २० फूट खोल खड्ड्यात जाऊन पडला. सुदैवाने या अपघातात कंटेनर चालकाला कोणतीही इजा झाली नाही. परंतु, ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - शिवनेरीवर आढळला शिवभक्ताचा मृतदेह, शिवजन्मोत्सवावेळी दूर्घटना घडल्याची शक्यता
हेही वाचा - दौंडमध्ये व्यापाऱ्यास लुटणारी टोळी गजाआड, ६० हजारांची केली होती लूट