ETV Bharat / state

Ajit Pawar On Pradeep Kurulkar : देशाविरोधात काम करणाऱ्या देशद्रोहींना शासन झाले पाहिजे - अजित पवार

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) चे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाविरोधात काम करणाऱ्या देशहद्रोह्यांना शासन झाले पाहिजे असे ते म्हणाले. ते आज पुण्यात प्रसारमाध्यामांच्या प्रतिनिधींनी संवाद साधत होते.

Ajit Pawar On Pradeep Kurulkar
Ajit Pawar On Pradeep Kurulkar
author img

By

Published : May 12, 2023, 5:51 PM IST

अजित पवार यांची प्रतिक्रिया

पुणे : पुण्यातील डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅप करून पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एटीएसने अटक केली आहे. अटकेनंतर कुरुळकरला 9 तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली होती. काल त्यांना पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना 15 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली आहे.

देशद्रोह करणाऱ्यांना कठोर शासन : विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुळकर यांच्याबाबत विचारले असता त्यांनी ही बातमी मीही वाचल्याचे सांगितले. जर कोणी आपल्या देशाविरुद्ध देशद्रोह करत असेल, तो कोणीही असो, त्यांना शासन झाले पाहिजे. देशाच्या सुरक्षेचा विचार करता जर कोणी देशद्रोही काम करत असेल तर त्यांना अजिबाद माफ करता येणार नाही. मात्र, विनाकारण कोणाला गोवण्याचा प्रयत्न करू नये. हे तितकेच खरे आहे. कागदपत्रांचे ठोस पुरावे असल्यास कारवाई करावी, असे पवार यांनी यावेळी मागणी केली आहे.

कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ : डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक केल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील न्यायालयात सांगितले की, प्रदीप कुरुलकर हे काही महिलांना भेटला होते. मंगळवार, 9 मे रोजी प्रदीप कुरुळकर यांना पुण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. एटीएसचे वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला सांगितले की, डीआरडीओ गेस्ट हाऊसचे रेकॉर्ड अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे गेस्ट हाऊसशी संबंधित तपास होऊ शकला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतर तपास अधिकारी गेस्ट हाऊसमधील आरोपींच्या आवाजाचीही तपासणी करतील. या युक्तिवादानंतर न्यायालयाने शास्त्रज्ञाच्या कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ केली.

गुप्त माहिती पाकिस्तानात : एटीएसने 4 मे रोजी पुण्यातून शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला अटक केली होती. प्रदीप करुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकवून डीआरडीओची गुप्तचर माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था Pakistan Intelligence Operative (PIO) यांना पाठवण्यात आली. प्रदीप कुरुळकर हे व्हॉट्सअॅप कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पीआयओच्या संपर्कात होते, अशीही माहिती मिळाली.

हेही वाचा

  1. Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळाला-अजित पवार
  2. Sharad Pawar for MVA stronger : महाविकास आघाडी मजबुतीची शरद पवारांची हाक, अजित पवारांच्या उपद्रवमूल्यावर प्रश्नचिन्ह
  3. CBSE Class 10 Results : सीबीएससी 10 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या कसा पहायचा दहावीचा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.