ETV Bharat / state

अडीअडचणींबाबत व्यापारी संघटनेने प्रस्ताव सादर करावा-  विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर - Divisional commissioner Deepak mhaisekar

कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली.

Trade association meet pune
Trade association meet pune
author img

By

Published : Jun 22, 2020, 3:32 PM IST

पुणे - व्यापारी महासंघाने आपल्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन सर्वांगीण बाबीचा विचार करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिले.

कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. पुणे व्यापारी महासंघाने सर्वांना सोयीस्कर ठरेल याचा विचार करून एकत्रित प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये प्रामुख्याने कामगारांच्या राहण्याच्या सोयीबरोबरच त्यांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याकरिता लागणारी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज, अग्निशमन यंत्रणा, मालाची वाहतूक, मालाची साठवण क्षमता, मालासाठी लागणारी गोदामे इत्यादी बाबींचा विचार करावा. मालाची वाहतूक करताना रहदारीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी केल्या.

शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठ शहराबाहेर हलविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, कन्व्हेक्शन सेंटर या प्रमुख मागण्याबाबतचे निवेदन पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले. कोरोना’मुळे टाळेबंदीच्या काळात पुणे शहरातील दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांचे वेतन, दुकानांचे भाडे, वीजबील यासारखे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असेही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, पुणे मर्चंट चेंबरचे पोपटलाल ओसवाल, पुणे टिंबर संघटनेचे रतन किराड, पुणे इलेक्ट्रीकल संघटनेचे सुरेश जेठवाणी, पुणे टाइल्स सॅनिटरी संघटनेचे जगदीश पटेल तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.