ETV Bharat / state

भीमाशंकर कोंढवळ धबधब्यात पर्यटकाला जलसमाधी; मृतदेहाचा शोध सुरू - one died bhimashankar water fall

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे, पाटण खोऱ्यामध्ये आठ दिवसांपासुन पावसाच्या अधुनमधुन जोरदार सरी पडत असल्यामुळे पर्यटकांची या भागात गर्दी वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविक, पर्यटक यांना बंदी आहे.

tourist dies at bhimashankar kondhwal waterfall
भीमाशंकर कोंढवळ धबधब्यात पर्यटकला जलसमाधी
author img

By

Published : Jun 18, 2021, 9:16 AM IST

Updated : Jun 18, 2021, 11:24 AM IST

पुणे - भीमाशंकर मधील कोंढवळचा धबधब्यात पर्यटकाला जलसमाधी मिळाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण सोन्याबाप्पू लहारे असे मृताचे नाव आहे.

घटनास्थळावरची दृश्ये

भीमाशंकर पासुन तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंढवळ येथील धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. 17 जूनला सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ येथील धबधब्यावर शिक्रापूरमधील 6 तरुण सहलीसाठी आले होते. मात्र, त्यातील लक्ष्मण सोन्याबाप्पू लहारे (वय-२९, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळगाव राहता, अहमदनगर) या पर्यटकाचा धबधब्याच्या प्रवाहात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. तहसिलदार रमा जोशी यांनी एनडीआरएफला पाचारण केले आहे.

पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह -

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे, पाटण खोऱ्यामध्ये आठ दिवसांपासुन पावसाच्या अधुनमधुन जोरदार सरी पडत असल्यामुळे पर्यटकांची या भागात गर्दी वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविक, पर्यटक यांना बंदी आहे. पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये यासाठी घोडेगाव पोलिसांचे तपासणी नाके असतानाही भाविक, पर्यटक येथे कसे फिरतात? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांमध्ये चर्चिला जात असताना पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर नागरिक शंका उपस्थित करत आहेत.

हेही वाचा - सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात 14 फुटांनी वाढ

कोंढवळ धबधब्याकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग हा पालखेवाडी चेक नाक्यावरून आहे. तरीही येथून पुढे भाविक, पर्यटक कसे येतात, संबंधित सोन्या लाहारे व त्यांच्या मित्रांना चेक नाक्यावरच अडविले असते तर ही दुर्घटना घडली नसती. या चेक नाक्यांवर काही भाविक, पर्यटकांना मागे पाठविले जाते. तर बहुतेक जणांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सोडले जाते. त्यामुळे या चेक नाक्यांवर पोलीस प्रशासनाचा नक्की काय गोंधळ चालू आहे? ते कळत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहे.

Last Updated : Jun 18, 2021, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.