ETV Bharat / state

पुण्याच्या बाणेर परिसरातून तीन लाखांचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक - md drug pune news

पुण्यात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल 3 लाख 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बाणेर परिसरातील नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीच्या परिसरात करण्यात आली.

पुण्याच्या बाणेर परिसरातून तीन लाखांचे अमली मॅफेड्रोन जप्त

author img

By

Published : Jul 12, 2020, 9:11 PM IST

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरातून एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ विकताना दोन जणांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील 43 वर्षीय विवेक लुल्ला, आणि 30 वर्षीय हेमा सिंग यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबईतून पुण्यात दोघेजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या दोघांकडे 65 ग्रॅम 450 मिलीग्राम एमडी अमली पदार्थ आढळून आला आहे. या कारवाईत तब्बल 3 लाख 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बाणेर परिसरातील नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीच्या परिसरात करण्यात आली.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. हे एमडी कुठून आणले होते आणि कोणाला विकण्यात येणार होते. या ग्राहकांचाही तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे एमडीया अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.