पिंपरी-चिंचवड (पुणे) - येथील सांगवी परिसरात अज्ञात तिघांनी 24 चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. यात स्कूल बस, रुग्णवाहिकेचा देखील समावेश असून सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना बुधवारी (दि. 22 जुलै) रात्री उशिरा घडली असून सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दहा दिवसांपासून शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 24 तास पोलीस बंदोबस्त असतानाही तोडफोडीची घटना घडली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
![ambulance](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12:51:40:1595488900_mh-pun-01-avb-todfod-mh10024_23072020114131_2307f_1595484691_944.jpg)